आझाद यांच्या सभेला संस्थेची परवानगी नाहीच, पुण्यातील भीम आर्मीची सभा अखेर रद्द

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण संस्थेनं परवानगी नाकाराल्यामुळे अखेर आता सभा रद्द करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2018 10:44 AM IST

आझाद यांच्या सभेला संस्थेची परवानगी नाहीच, पुण्यातील भीम आर्मीची सभा अखेर रद्द

पुणे, 30 डिसेंबर : पुण्यातील भीम अर्मीची सभा रद्द करण्यात आली आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण संस्थेनं परवानगी नाकाराल्यामुळे अखेर आता सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या sspms मैदानावर स्टेज गुंडाळण्याचं काम सुरू आहे.


चंद्रशेखर आझाद यांची पुण्यातील sspms मैदानावर सभा होणार होती. परंतु, जागा मालकाने परवानगी दिल्याचं पत्र आयोजकांनी दाखवावं, असं पुण्याचे पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी सांगितलं होतं. परंतु, sspms मैदानावर सभा घेण्याबाबत जागा मालकाने भीम आर्मीला परवानगी नाकारली होती.


सुरुवातीला या मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सभेची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. जागा मालकाने परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...


भीम आर्मीचे दत्ता पोळ हे मुंबईला रवाना झाले होते. त्यांनी रविवारी सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनाली हाॅटेलमध्ये जाऊन चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली होती.


या भेटीनंतर आव्हाड यांनी न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. "त्याला हाॅटेलमध्ये डांबून ठेवणे चुकीचे आहे. राज्यात त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तरीही त्याला डांबून ठेवण्यात आलं आहे. संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशी कारवाई करणे हा संविधानाचा अपमान आहे", अशी टीका आव्हाड यांनी केली होती.


VIDEO : पतीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेची मोलकरणीला बेदम मारहाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2018 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...