मराठी बातम्या /बातम्या /पुणे /बावनकुळेंच्या युटर्न नंतर चंद्रकांत पाटलांचा बाउन्सर; शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत मोठा खुलासा

बावनकुळेंच्या युटर्न नंतर चंद्रकांत पाटलांचा बाउन्सर; शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत मोठा खुलासा

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपची जागा वाटपाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 19 मार्च : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 240 तर शिवसेना शिंदे गट 48 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप मागील काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुकीची तायरी करत आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुकीची तयारी करत आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही. आमची तयारी शिवसेनेला उपयोगी पडेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

  संप मागे घेण्याचं आव्हान  

त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी तीन उच्च अशा आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. तरी देखील अत्यावश्यक सेवेतील संपकरी हे देखील संपात सहभागी झाले आहेत. मात्र हा काळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा असल्याने तसेच रुग्णांचे मोठया प्रमाणात हाल होत असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं, अस आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत.  त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर हेल्थकेअर सेंटर आणि आय हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Eknath Shinde, Shiv sena