• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • '...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो' चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो' चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Chandrakant Patil clarification on ex minister statement: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:
पुणे, 19 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याची क्लिप जोरदार व्हायरल झाली आणि राज्यात विविध चर्चांना उधाण आले. चंद्रकांत पाटील हे देहू येथील एका कार्यक्रमात पोहोचले होते त्यावेळी माईकवरुन एकाने माजी मंत्री असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं पाटलांनी विधान केलं होतं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं होतं. त्यानंतर आज पुण्यात (Pune) या संपर्ण प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण (Chandrakant Patil clarification on his statement) दिलं आहे. पुण्यात गणेश विसर्जनापूर्वी गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री म्हणू नका या विधानावर पत्रकारांनी विचारले की, 48 तासांची मुदत संपली आहे काय बोलाल. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, मी घडलेला प्रसंग सांगतो. कोविडच्या निमित्ताने नाभिक समाजातील एक तरुण माझ्या संपर्कात आला. त्यावेळी मी त्याला सांगितलं होतं की चांगलं सलून तुला उभं करुन देईन. ते सलून देहू येथे त्याच्या सासरवाडीला उभं झालं. त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला मी गेलो. तेथे ग्रामीण भागात असलेल्या माईक सिस्टमवरुन अनाऊसमेंट सुरू होती. माजी मंत्री बाळासाहेब ढवळे यांनी पुढे यावं त्यावेळी मी म्हटलं ए माजी काय म्हणतो काही दिवसांनी ते आजी होतील. Shiv Sena आणि NCP ने आखला मास्टर प्लॅन, भाजपला मोठं खिंडार पडणार? यामध्ये मला माजी मंत्री म्हणू नका असा काही विषय नाही. एवढ्या छोट्या गावातही कुणीतरी क्लिप केली आणि फिरवली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात खूप चर्चा झाली. माझा कुठलाही असा हेतू नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. "एकत्र आलो तर भावी सहकारी..." चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल होत असतानाच दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना - भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी" असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत. युती होणार का? संजय राऊतांनी म्हटलं... संजय राऊत यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
Published by:Sunil Desale
First published: