Tauktae : उद्धव ठाकरेंनी 8 दिवस कोकणात जाऊन राहावं, अजित दादांनी त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, चंद्रकांत पटलांचा सल्ला
Tauktae : उद्धव ठाकरेंनी 8 दिवस कोकणात जाऊन राहावं, अजित दादांनी त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, चंद्रकांत पटलांचा सल्ला
Pune Chandrakant Patil मोदींनी तौक्ते चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
पुणे, 22 मे : तौक्ते चक्रीवादळामुळं (Tauktae Cyclone) झालेल्या नुकसानीनंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. चक्रीवादळानंतरचे दौरे मदत यावरून सत्ताधारी आणि विरोधातील भाजप नेत्यांमध्ये (BJP vs MVA) सध्या कलगीतुरा रंगत आहे. आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट कोकणात जाऊन (Ajit Pawar)आठ दिवस राहण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळं ही तूतू-मैमै लवकर बंद होण्याची चिन्हं दिसत नाहीत.
(वाचा-Mig 21 Crash मुलाच्या आवडत्या टी शर्टवर वडिलांनी दिली अखेरची सलामी)
चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस कोकणामध्ये जाऊन राहवं. त्याठिकाणच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होईल. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन त्याठिकाणी काम करत नाही असा आरोप त्यांनी लावला. सोबतच मुख्यमंत्र्यांना राहायला तिकडं वातावरणही चांगलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
(वाचा-'इंडियन व्हेरियंट' उल्लेख असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट हटवा - केंद्र)
अजित पवारांवरदेखिल पाटील यांनी टीका केली. संजय राऊत यांच्यानंतर आता महाराष्ट्रात अजित पवारांना मार्गदर्शन करण्याचा आणि सल्ले देण्याचा आधिकार आहे. पण त्यांचा हा प्रकार सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को, असा असल्याची टीका पाटलांनी केली. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. 3 तासांत पाहणी होत नसते. तसंच अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनीही 8 दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असं पाटील म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर होत असलेल्या टीकेवरूनही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं. पंतप्रधान मोदी भावूक झाले त्यावरुनही विरोधक टीका करत आहेत. राजकारणाची पातळी खालावल्याचं हे चिन्हं असल्याचं पाटील म्हणाले. एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करणं योग्य नाही. पण मोदींना त्याने काही फरक पडत नाही, असंही पाटील म्हणाले.
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मोदींनी महाराष्ट्राशी भेदभाव केल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. मोदींनी तौक्ते चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच हवामान खराब असल्यामुळं मोदींना महाराष्ट्रात येणं शक्य नव्हतं असं पाटील म्हणाले. आता यावर आघाडीचे नेते पुन्हा उत्तर देणार त्यामुळं आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र असं सुरू राहण्याची दाट शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.