• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • मुंबई-पुणेकरांनो लक्ष द्या! दोन शहरांतील रेल्वेसेवा आता बंद राहणार

मुंबई-पुणेकरांनो लक्ष द्या! दोन शहरांतील रेल्वेसेवा आता बंद राहणार

मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस मागील आठवड्यात रद्द करण्यात आली होती. जून अखेरपर्यंत ही ट्रेन रद्द करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 मे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 14 मेपासून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि मुंबई प्रवासादरम्यान स्वतंत्र रेल्वे नाही, त्यामुळे दोन्ही शहरांमधून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्याचा एकच पर्याय आहे. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर रेल्वेने पुन्हा गाड्या सुरू केल्या. यात मुंबई-पुणेसाठीच्या इंद्रायणी एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीनचाही समावेश होता. रिपोर्टनुसार, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना, पुन्हा एकदा रेल्वेने मुंबई-पुणे साठीच्या या गाड्या रद्द केल्या आहेत.

  (वाचा - मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोना लसीकरण मोहिमेत बदल; आता कसं होणार Vaccination पाहा)

  मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस मागील आठवड्यात रद्द करण्यात आली होती. जून अखेरपर्यंत ही ट्रेन रद्द करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. 14 मे पासून पुढील सूचना येईपर्यंत गाडी बंद राहील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

  (वाचा - पुण्यात बेडसाठी थेट मुंबई हायकोर्टातून कंट्रोल रूमला फोन; पाहा काय आहे प्रकार)

  त्याशिवाय, डेक्कन क्वीनसह कोल्हापूर-मुंबई ट्रेनही पुढील सूचना येईपर्यंत 18 मे पासून रद्द केली जाईल. याधीही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-अहमदाबाद, पुणे-फलटण या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  Published by:Karishma Bhurke
  First published: