कोरोना संकटात केंद्राकडून पुण्याला शून्य रुपयाची मदत, धक्कादायक माहिती उघड

कोरोना संकटात केंद्राकडून पुण्याला शून्य रुपयाची मदत, धक्कादायक माहिती उघड

भाजपच्या 98 नगरसेवकांनी एका महिन्याचा दोन कोटी रूपये पगार पीएम केअर निधीला दिल्यामुळे आता पुणेकरांच्या पदरात काय पडलं? असा प्रश्न विचारला जात आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 14 जून : पुणे शहर हे राज्यात दुसऱ्या आणि देशात तिसऱ्या क्रमांकाचं कोरोनाबाधित शहर आहे. मात्र या शहराला केंद्र सरकारकडून एक रूपयाचीही मदत झाली नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. एकीकडे भाजपच्या 98 नगरसेवकांनी एका महिन्याचा दोन कोटी रूपये पगार पीएम केअर निधीला दिल्यामुळे आता पुणेकरांच्या पदरात काय पडलं? असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोनाबाधितांची संख्या पुण्यात 9 हजारांवर पोहोचली आहे. लॉकडाऊनमुळे महापालिकेचं मोठ आर्थिक नुकसान तर झालंच आहे, मात्र कोरोनासोबत लढण्यासाठी मोठी आर्थिक तरतूदही केली आहे. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी महापालिकेला निधीची गरज आहे. त्यात केंद्राचा वाटा आजपर्यंत एक रूपयाचाही आलेला नाही, हे स्पष्ट झालं आहे. आशिष माने या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी हा अर्ज केला होता.

भाजपच्या नगरसेवकांनी 1 महिन्याचं 2 कोटी रूपये मानधन पीएम केयरला दिल्यानेही वादंग झाला होता. आता तर हे दोन कोटी रूपये दिल्यानंतर महापालिकेला एक रूपयाही  पदरात पडलेला नाही. त्यामुळे शहर भाजप आणि केंद्र सरकार वर टीका केली जात आहे.

दरम्यान, याबाबत पुण्याच्या महापौरांनी मात्र चेंडू राज्याच्या कोर्टात टोलवला आहे. राज्य सरकारकडूनही आजवर महापालिकेला एक रुपयाही दिला गेला नसल्याची टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे कुठल्याही पक्षाकडे असले तरी पुणेकरांच्या पदरात मात्र कोरोनाच्या काळात काहीच पडलेलं नाही, हे उघड झालं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 14, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading