पुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

पुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

पुण्याच्या वडगाव धायरी परिसरात हसन शेख यांची ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

30 मार्च : पुण्याच्या वडगाव धायरी परिसरात हसन शेख यांची ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याप्रमाणे २९ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास 2 व्यक्तींनी येऊन गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवल्याचं स्पष्ट दिसून येतय.

त्यानंतर शेजारी पार्क केलेल्या गाडीच्या मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने तात्काळ आपली गाडी तिथून हटवली मात्र ऑडीचा डिझेल टँक फुटून डिजेल पसरल्याने आग ही पसरली आणि बाजूला उभ्या असलेल्या होंडा सिटा कारनेही पेट घेतला. ही आग इतकी भंयकर पेटली की काही वेळातच उष्णतेमुळे सीसीटीव्ही कॅमेरेही वितळून गेले.

हसन शेख यांनी या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हसन शेख यांच्यावर यापूर्वी ही खून करण्याच्या उद्देशातून हल्ला झाला होता त्यातून ते बालंबाल बचावले होते. हसन शेख यांच्यावरही सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता सिंहगड पोलिसांनी वर्तवलीये. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय मात्र अजूनपर्यंत आरोपी फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 08:23 AM IST

ताज्या बातम्या