पुण्यात जात पंचायतीनं महिलेसह कुटुंबाला केलं बहिष्कृत; नीलम गोऱ्हेंनी केली 'ही' मागणी

पुण्यात जात पंचायतीनं महिलेसह कुटुंबाला केलं बहिष्कृत; नीलम गोऱ्हेंनी केली 'ही' मागणी

जात पंचायत भरण्यावर राज्यात कायदेशीर बंदी असतानाही पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे गावातील भातु समाजाची जातपंचायत भरून एका महिलेसह तिच्या कुटुंबियासह बहिष्कृत केलं आहे.

  • Share this:

पुणे, 6 डिसेंबर: जात पंचायत भरण्यावर राज्यात कायदेशीर बंदी असतानाही पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे गावातील भातु समाजाची जातपंचायत भरून एका महिलेसह तिच्या कुटुंबियासह बहिष्कृत केलं आहे. हा प्रकार 3 डिसेंबर रोजी घडला आहे.

या प्रकरणी जातपंचायतीच्या सात पंचांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. जागेचा वाद सोडवण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेच्या कुटुंबाला 5 बोकड 5 दारू बाटल्या आणि 1 लाख रुपयांची मागणी केली होती. जात पंचायत गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा...शक्तीशाली स्फोटानं सांगली हादरलं, एक ठार दोन गंभीर; अनेक वाहनं जळून खाक

निलम गोऱ्हे यांनी जात पंचायत गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

जात पंचायतीच्या पंचांवर हा गुन्हा दाखल झाला आहे, ही बाब स्वागतार्ह असली तरी देखील आरोपींवर कडक कारवाई जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही. सदरील गुन्ह्यात आरोपींवर कडक कारवाई होण्यासाठी तपासात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये. गुन्ह्याची चार्जशिट तात्काळ पूर्ण करून गुन्हा फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात यावा, अशा मागणी निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जातपंचायतींना कायदा अवगत करण्यासोबत सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घेऊन कायदा अंमलबजावणी करावी अशी माझी सुचना होती पण त्याची पूर्तता बाकी आहे.ती आपण करावी तसेच आपण जातपंचायतीच्या अयोग्य प्रथांच्या विरोधात प्रबोधन व कडक कार्यवाहीची मोहिम हाती घ्यावी याकडे मी आपले लक्ष वेधत आहे, असं देखील निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मालमत्तेचा न्यायनिवाडा जात पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जातपंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केलं आहे. त्याशिवाय वर्षांच्या आतमध्ये समाजात परत यायचे असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रूपये दंड रोख देण्याची आश्चर्यकारक मागणी जात पंचायतीने केली आहे. याप्रकरणी कोर्ट-कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सासवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुरेश रतन बिनावत (वय 65), नंदू अत्राम रजपतू (वय 55), संपत पन्नालाल बिनावत (वय 56), मुन्ना रमेश कचरवत (वय 57), आनंद रामचंद्र बिनावत (वय 50), देवीदास राजू चव्हाण (वय 52), देवानंद राजू कुंभार (वय 51) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गराडे गावातील राजलीला मंगल कार्यालयामध्ये जात पंचायत भरवण्याचा प्रकार घडला आहे. सदर महिलेने वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला होता. त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी बेकायदेशीरपणे जात पंचायत भरवण्यात आली.

यावेळी उपस्थित असलेल्या सहा जणांनी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलीचा काहीच अधिकार नाही असा न्यायनिवाडा केला व त्या महिलेसह कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले. परत जातीत यायचे असेल तर पाच बोकड,पाच दारूच्या बाटल्या व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकारात सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कायदे व कलम अमलात आणून भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान केल्याबद्दल व सामाजिक बहिष्कार यापासून व व्यक्तिचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलमानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केल्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन करते.

हेही वाचा...पुण्यात बर्थडे पार्टीत तिघांनी केली 'गंदी बात', महिलेसमोरच विवस्त्र अवस्थेत केला

दरम्यान, याबाबतचा जातपंचायतीने बहिष्कृत करण्याच्या विरोधात विधीमंडळाने कायदा मंजुर केलेला असुनही 2017 ते 2018 या दोन वर्षात अनुभवास आले की जातपंचायतीच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनवर तक्रारी घेतल्या जातांना दिरंगाई होत होती.विशेषतः याच प्रकारे समांतर नियमावली काही जातपंचायतींनी करुन स्वत:चे नियम स्विकारण्यास भाग पाडले जात होते.तत्कालीन ग्रुहराज्यमंत्री ना.रणजित पाटील यांच्या समवेत मंत्रालयात मी सामाजिक कार्यकर्त्या सोबत बैठक घेतली होती व त्यात अनुभवी अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरावर हा विषय नागरी हक्क संरक्षण विभागाच्या देखरेखीखाली सोपविण्याचा निर्णय झाला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: December 6, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading