तृप्ती देसाईंना धमकी दिल्याप्रकरणी विदर्भातील या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

तृप्ती देसाईंना धमकी दिल्याप्रकरणी विदर्भातील या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहिला होता.

  • Share this:

पुणे,2 नोव्हेंबर: भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना धमकावल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांनी 31 ऑक्टोबरला फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावरून प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना फेसबुकवर शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहिला होता. याप्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये बच्चू कडू यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही आहे तृप्ती देसाईंची फेसबुक पोस्ट..

तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर बच्चू कडू यांचे समर्थक तसेच प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना फेसबुकवर शिवीगाळ आणि बदनामीकारक मजकूर लिहिला होता. अत्यंत वाईट कमेंट करण्यात आले होते.

बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यात फोनवर बाचाबाची...

यादरम्यान, बच्चू कडू आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून धमकी दिल्याची तक्रार तृप्ती देसाईंनी केली आहे. या संवादादरम्यान, 'तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, अती शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिल्याचे तृप्ती देसाई यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत...

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मानसोत्तर पावसाने राज्यात थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान राडा, गाड्यांची केली जाळपोळ, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या