मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीविरोधातला आरोप चुकीचा? गुन्ह्यासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीविरोधातला आरोप चुकीचा? गुन्ह्यासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी (sister-in-law) संदर्भात सवाल उपस्थित केला आहे. मात्र या दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

पुणे, 08 नोव्हेंबर: अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader Nawab Malik) नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर नवा आरोप केला आहे. यावेळी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी (sister-in-law) संदर्भात सवाल उपस्थित केला आहे. मात्र या दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

नेमका कोणता गुन्हा दाखल

समीर वानखेडे यांच्या प्रकरणांमध्ये आज नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर हिच्या संदर्भातला एक खुलासा केला. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांनी 2008 मध्ये हर्षदा रेडकरविरोधात अंमली पदार्थांच्या विरोधातला गुन्हा दाखल आहे असं म्हटलं आहे. मात्र प्रत्यक्षात हा गुन्हा बेकायदा देहविक्रीसाठी दाखल झाला असल्याची नोंद पुणे पोलिसांच्या अभिलेखावर आहे.

नवाब मलिकांचा आरोप

आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करून विचारले आहे की, तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे की, समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे. नवाब मलिकांनी या मुद्द्यावर समीर वानखेडे यांच्याकडून उत्तर मागितलं.

हेही वाचा- प्लॉट व्यावसायिकाच्या हत्येचं उलगडलं गूढ; पोटचा लेकच निघाला खुनी, धक्कादायक कारण समोर 

नवाब मलिक यांनी ट्विट करून समीर वानखेडे यांना सवाल केला की, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यानं तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. हा याचा पुरावा असल्याचं ट्विट मलिकांनी केला आहे.

समीर वानखेडेंचं उत्तर

नवाब मलिकांच्या सवालावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, जानेवारी 2008 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा मी सेवेतही नव्हतो. मी 2017 मध्ये क्रांती रेडकरशी लग्न केलं. मग तरीही मी या केसशी कसा जोडला जातो?, असा सवालही समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

First published:

Tags: Nawab malik, NCB