Home /News /pune /

कार पलटी झाली आणि तरुणाला घेऊन खंडाळा घाटाच्या दरीत कोसळली, अखेर...

कार पलटी झाली आणि तरुणाला घेऊन खंडाळा घाटाच्या दरीत कोसळली, अखेर...

फुटबॉलचा नाईट सराव करण्यासाठी तो लोणावळा ते खोपोलीला नेहमी जात असतो. मात्र, गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मारुती झेन कारमधून जात असताना...

    गणेश दुडम,प्रतिनिधी खंडाळा, 03 ऑगस्ट  : 'देव तारी त्या कोण मारी', असं नेहमी म्हटलं जात पण त्याचा प्रत्यय आता खंडाळा घाटात (khandala ghat) आला.  खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा जवळून कारसह दरीत पडलेल्या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.  खोपोलीमधील सामाजिक संस्थेच्या युवकांना या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. मिळालेली माहिती अशी की, सागर सुरेश वावळे (sagar vavale) असं जखमी युवकाचं नाव आहे. सागर हा फुटबॉल खेळाडू आहे. फुटबॉलचा नाईट सराव करण्यासाठी तो लोणावळा ते खोपोलीला नेहमी जात असतो. मात्र, गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मारुती झेन कारमधून जात असताना अचानक त्याच्या गाडीला मागून धडक बसल्याचा त्याला भास झाला आणि काही कळायच्या आतच त्याची गाडी उलटी पलटी होत थेट गाडीसह दरीत कोसळली. Heart Attack मुळे दररोज मरताहेत चारातले 3 लोक; धक्कादायक आकडेवारी आली समोर! या घटनेची माहिती समजताच खोपोली महामार्ग पोलीस आणि येथील स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. रात्रीचा अंधार, पावसाच्या सरी आणि निसरडा झालेला कडा असं संकट समोर असताना देखील अपघातग्रस्तांच्या टिमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या किर्रर्र काळोखात आवाजावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी जखमी सागरचा शोध घेतला आणि त्याच्या जगण्याच्या आशा पल्लवीत करून धीर दिला व काही मिनिटांत जखमी सागरला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. अखेर  मजल दरमजल करत त्याला दरीच्या बाहेर काढले. जखमी सागरवर खोपोलीतील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी असंच काहीसं सागर बाबतीत घडलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या