मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारच्या धडकेत 6 जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारच्या धडकेत 6 जण गंभीर जखमी

दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहणांची गर्दी होती. यात रस्ता ओलांडणाऱ्या एका टेंपोला समोरून येणाऱ्या क्रेटा कारने जोरात धडक दिली.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. तळेगावमधील ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणे लेनला हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिंद्रा पिकअप टेंपोला क्रेटा कारची जोरदार धडक बसली आहे. या भीषण अपघातात 4 जण गंभीर जखमी तर 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. भर दिवसा हा अपघाता झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहणांची गर्दी होती. यात रस्ता ओलांडणाऱ्या एका टेंपोला समोरून येणाऱ्या क्रेटा कारने जोरात धडक दिली. या धडकेत एकून 6 जण जखमी झाले आहे. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थाळी धाव घेतली आणि जखमींना ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. यात 4 जण जखमी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

अपघात घडल्यानंतर रस्त्यावर बघ्यांनी गर्दी केली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. रस्त्यावरून अपघाती वाहनांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे. नेमका अपघात कसा झाला याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी नाशिक-पुणे महामार्गावरही भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता.

इतर बातम्या - दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं..

नाशिक-पुणे महामार्गावर टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोची धडक बसताच रिक्षाने पेट घेतला. या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता सिन्नर येथील आडवा फाटा परिसरात हा अपघात झाला. टेम्पो चालक मद्यधुंद असल्याचे समोर आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! पतीचे वार पत्नीने अंगावर झेलले पण दिराने पुसलं कुंकू

मिळालेली माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या पेट्रोल टॅकचा स्फोट झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. इतर तिघे गंभीररित्या होरपळले आहेत. त्यात वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी, सिन्नर नगरपालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाने पाणी मारत रिक्षाला लागलेली आग आटोक्यात आणली. स्थानिकांनी रिक्षा तोडून जखमींना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेड व स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु करत जखमींना उपचारासाठी यशवंत रुग्णालयात दाखल केले आहे.

मद्यधुंद होता टेम्पोचालक..

इतर बातम्या - महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

टेम्पोचालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. टेम्पोने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत तीनजण जखमी झाले. अपघातानंतर नाशिक-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

VIDEO : युतीचं फायनल झालं की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात...

Published by: Akshay Shitole
First published: September 21, 2019, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading