पुण्यात रेसकोर्सच्या अगदी समोर फुटपाथवर हे कुटुंब बसलं होतं. ते साधारण तिथेच जवळपास असतात. मुळचे बारामतीचे आहेत पण करोनामुळे घरमालकाने बाहेर काढलं. मुलीची डिलिव्हरी ससूनमध्ये झाली होती. पण घरदारच नाहीये. त्यात कोणाकडे तरी भिक मागून दिवस जायचा. पण आता सगळंच बंद आहे. अशात गरीबांना मदत करणाऱ्या संस्था रोज खायला देतात खरं पण कायम ते शक्य नाही. आईचं दूध बंद झाल्यामुळे बाळाला दूध देणंही शक्य नाही. हे वाचा - तुमच्या घरात अंधार न व्होवो म्हणून 6 महिन्याच्या मुलीला कुशीत घेऊन काम करतेय आई! आमच्या एका ओळखीच्या पत्रकाराने परवाच या कुटुंबाशी चर्चा केली, पण त्यांनी निर्वासित शाळेत राहण्यास नकार दिला. तिथे गेल्यावर जास्त आजार होईल. इथे रस्त्यावर राहिल्याने काही होत नाही असं त्या बाईंनी सांगितलं. एका बाजूने विचार केला तर हेदेखील खरंच आहे म्हणा. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, आयुष्याच्या एवढ्या कठीण परिस्थितीतही 'रस्त्याहून जाणारे कोणीही खायला देत आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका' असं त्या बाईंनी म्हटलं. यावरून तुम्ही त्यांच्या ताकदीचा आणि सकारात्मकतेचा अंदाज लावू शकता. हे वाचा - मृत्यूचं केंद्र बनतंय हे रुग्णालय! एकाच खोलीत 40 मिनिटांत 10 रुग्णांचा मृत्यू पुण्यातले अनेक पत्रकार मित्र आणि इतरांसाठी काम करणाऱ्या संस्था रोज यांच्यापर्यंत डबा पोहोचवतात. पण यांना अगदी योग्य मदतीची गरज आहे. या बातमीमागे निव्वळ त्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. कारण आपल्या देशाची हीच खरी एकात्मता आहे. या कुटुंबाची हाक प्रशासनापर्यंत जावी आणि यांना मदत मिळावी हीच प्रार्थना!बाळाला जन्म देऊन त्याची आई आणि आजी आजोबा अक्षरशः निर्वासितांसारखे फिरत आहेत. आज मात्र त्यांची ही अवस्था पाहून जीव कळवळला. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि बाळाला योग्य तो आहार मिळावा हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे.@OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @PuneCityPolice @kolhe_amol pic.twitter.com/yuPnbDj92K
— renuka dhaybar (@renu96dhaybar) April 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.