Home /News /pune /

वयाच्या ऐंशीतही रतन टाटा यांच्यातील माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन; पुण्यात घडली भावनिक भेट

वयाच्या ऐंशीतही रतन टाटा यांच्यातील माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन; पुण्यात घडली भावनिक भेट

भारतातील बहुतांश उद्योजक केवळ नफा-तोट्याचाच विचार करत असताना रतन टाटा मात्र या सगळ्याला अपवाद ठरले आहेत. त्यांच्यातील माणुसकीचं नुकतंच घडलेलं दर्शन सुखद आहे.

    पुणे, 05 जानेवारी : टाटा उद्योगसमूहाचे विद्यमान अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी आजवर अनेकदा आपल्या संवेदनशील आणि आभाळाइतक्या मोठ्या मनाचं (humanity) दर्शन घडवलं आहे. व्यावसायिक आणि मानवी मूल्य चोखपणे जपत एक आगळाच आदर त्यांनी आजवर कमावला आहे. नुकतीच या आदरात भर टाकणारी घटना पुण्यात (pune) घडली आहे. रतन टाटा यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत मुंबईहून पुणे गाठलं. त्यामागचं कारण अतिशय भावनिक होतं. टाटा यांना आपल्या एका माजी कर्मचाऱ्याची (ex employee) भेट घ्यायची होती. हा कर्मचारी मागच्या 2 वर्षांपासून आजारी आहे. याकारणाने टाटा यांनी त्याला भेटण्यासाठी म्हणून मुंबईहून पुण्यापर्यंत प्रवास केला. टाटा पुण्यातील फ्रेंड्स सोसायटी (friends society) इथं पोहोचले. याबाबतची माहिती सोशल मीडियावर (social media) मिळाली आहे. या मंचावर त्याबाबत वाचून अनेकांची मनं हेलावून गेली आहेत. हे वाचा - Facebook Live सुरू करुन आत्महत्या करत होता; आयर्लंडच्या हेडक्वार्टरने दिला अलर्ट याबाबत योगेश देसाई (yogesh Desai) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या माजी कर्मचाऱ्याची रतन टाटा भेट घेत असतानाचा फोटोही शेअर केला आहे. सोबत देसाई यांनी लिहिलं आहे, 'या भेटीदरम्यान तिथं ना मीडिया होता, ना संरक्षक कडं करून उभं राहणारे बाउंसर्स. मला दिसलं ते केवळ इमानदार कर्मचाऱ्याबाबतचं समर्पण. यातून सगळ्या उद्योगपतींनी शिकलं पाहिजे, की केवळ पैसा हे सर्वस्व नसतं.' याशिवाय अशीही चर्चा अनेकांमध्ये आहे, की रतन टाटा यांनी या कुटुंबाचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. हे वाचा - कायच्या काय! 9 वर्षांच्या मुलानं चक्क LED Bulb गिळला; पुढे नक्की काय घडलं वाचा कोरोनाच्या काळातही जेव्हा जगभरातील उद्योगसमूह आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यास तत्पर होते, त्याकाळात टाटा यांनी याबाबत तीव्र विरोधाचा सूर लावला होता. त्यांनी याला सहानुभूतीचा अभाव असं म्हटलं. सोबतच उद्योगजगताला असं न करण्याचं आवाहनही केलं. 'हे सगळे असे लोक आहेत, ज्यांनी तुमच्या उद्योगाला इथवर आणण्यासाठी त्यांचं मूल्यवान आयुष्य दिलं. तुम्ही थोड्याशा आणीबाणीला घाबरत त्यांना बाहेर काढत आहात. हीच तुमच्या मूल्यांची व्याख्या आहे का?', असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Ratan tata

    पुढील बातम्या