साखरपुड्याला जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना

साखरपुड्याला जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना

40 प्रवासी घेऊन जाणारी भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली. या अपघातात 25 जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • Share this:

अंनिस शेख (प्रतिनिधी),

मावळ, 27 डिसेंबर: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express way) एका खासगी बसला भीषण अपघात (Accident) झाला. मुंबई-पुणे महामार्गावर किवळे एक्झिटजवळ  (Kivale Exit )रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं. या अपघातात 25 जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

हेही वाचा.. मोठी बातमी, पार्थ पवार पुन्हा निवडणूक लढवणार, पंढरपुरातून मिळणार उमेदवारी?

मिळालेली माहिती अशी की,  40  प्रवासी घेऊन जाणारी भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उलटली आणि बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना महामार्गालगतच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं आहे.  अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ही बस शहापूरहून (मुंबई) सांगलीकडे निघाली होती, अशी माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर महामार्ग पोलीस, देहू रोड पोलीस, देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केलं आहे. जखमींना महामार्गालगतच्या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात काही दिवसांपूर्वी मिनीबसचा अपघात झाला. या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.  शिंगरोबा देवस्थानच्या मागील बाजूच्या खोपोलीच्या दिशेच्या वळणावर हा अपघात झाला होता. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली.

Published by: Sandip Parolekar
First published: December 27, 2020, 12:45 PM IST

ताज्या बातम्या