शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी

शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव एसटीची ट्रॉलीला धडक, जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल

  • Share this:

अनिस शेख (प्रतिनिधी)मावळ, 25 डिसेंबर: मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 15 विद्यार्थ्यांसह तीन शिक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव खिंडीत पहाटे चारच्या सुमारास सहलीला गेलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली या कारणाने एसटी बस मधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेरच्या बी. जे खताळ विद्यालयाचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.

खताळ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची अलिबागला सहल गेली होती. सहलीहून परत संगमनेरला जात असताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर उसाच्या मोठ्या महामार्गावर आल्या तर एसटीही बंद पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सध्या पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान अशा पद्धतीनं ट्रॉली महामार्गावर बंद पडली असल्याची पूर्व कल्पना कोणालाही देण्यात आली नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकायदयक बनत चालला आहे. बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-कल्याण-डोंबिवली रेल्वे मार्गावर 5 तासांचा विशेष मेगाब्लॉक

हेही वाचा- ग्वाल्हेर ते नवी दिल्ली प्रवास एका 'अटल 'संघर्षाचा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या