मराठी बातम्या /बातम्या /पुणे /गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं पडलं महागात, 200 जणांवर गुन्हा दाखल

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं पडलं महागात, 200 जणांवर गुन्हा दाखल

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं भोवलं, 200 जणांवर गुन्हा दाखल

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत भरवणं भोवलं, 200 जणांवर गुन्हा दाखल

200 people booked for organise bullock cart race: बैलगाडा शर्यतीस बंदी असतानाही शर्यतीचं आयोजन केल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, 6 नोव्हेंबर : बैलगाडा शर्यत (bullock cart race) आयोजनावर बंदी असतानाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walase Patil) यांच्या मतदारसंघात शर्यत भरवण्यात आली. याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण 200 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल (200 booked for organising bullock cart race) केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात आंबेगाव (Aambegaon) तालुक्यातील गिरवली (Giravali) आणि वडगाव काशिंबे (Vadgaon Kashimbe) गावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race on Diwali Padwa) आयोजन करण्यात आलं होतं.

घोडेगाव पोलीसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर, तर मंचर पोलिसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर भा. द. वि. क. 188, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ), म.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात 2 ठिकाणी बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी मोडून अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे प्रकार घडताना दिसत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्याच मतदारसंघातच दिवाळी पाडव्याला 2 ठिकाणी बैलगाडा शर्यत पार पडली. विशेष पोलिसांचे याकडे दुर्लक्ष पाहायला मिळालं.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि गिरवली गावात या शर्यती बैलगाडा झाल्या. बैलगाडा घाटात भंडाराची उधळण करत बैलगाडा मालकांसह तरुणाईची या निमित्त मोठी गर्दी झाली होती.

धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी कोरोनाच्या नियम पायदळी तुडवण्यात आले. जमलेल्या गर्दीमध्ये कुणीही साधे मास्क सुद्धा वापरले नव्हते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, मंचर आणि घोडेगाव पोलिसांचे बैलगाडा घाटाकडे दुर्लक्ष होते. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता.

ऑगस्ट महिन्यात सांगतील बैलगाडा शर्यतीचा धुरळा

बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत (Sangli) करण्यात आलं आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळालं. सांगली पोलिसांनी जंग जंग पछाडलेला नंतरही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली होती. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.

यासोबतच ज्या शेतकऱ्यांची बैल शर्यतीत धावणार होती त्या मोजक्याच शेतकऱ्यांना या शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावर माळावर येऊन थांबले होते. सकाळी या ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले आणि तीन वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आली.

First published:

Tags: Crime, Pune