मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात 2 ठिकाणी बैलगाडा शर्यत, भि..र्रर्रर्र थराराचा LIVE VIDEO

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात 2 ठिकाणी बैलगाडा शर्यत, भि..र्रर्रर्र थराराचा LIVE VIDEO

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्याच मतदारसंघातच पाडव्याला 2 ठिकाणी  भि..र्रर्रर्र..झाली आणि विशेष पोलिसांचे याकडे दुर्लक्ष पाहायला मिळालं.

आंबेगाव, 05 नोव्हेंबर : राज्यात बैलगाडा (bullcart) शर्यतीवर हायकोर्टाच्या (high court) मनाईमुळे बंदी आहे. बंदी मोडून अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे प्रकार घडले आहे. आता तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्याच (dilip walse patil) मतदारसंघातच पाडव्याला 2 ठिकाणी  भि..र्रर्रर्र..झाली आणि विशेष पोलिसांचे याकडे दुर्लक्ष पाहायला मिळालं.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि गिरवली गावात या शर्यती बैलगाडा झाल्या. बैलगाडा घाटात भंडाराची उधळण करत बैलगाडा मालकांसह तरुणाईची या निमित्त मोठी गर्दी झाली होती.

धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी कोरोनाच्या नियम पायदळी तुडवण्यात आले. जमलेल्या गर्दीमध्ये कुणीही साधे मास्क सुद्धा वापरले नव्हते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, मंचर आणि घोडेगाव पोलिसांचे बैलगाडा घाटाकडे दुर्लक्ष होते. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता.

नामिबियाच टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण करणार होतं पण, त्या 4 ओव्हर ठरणार त्रासदायक

विशेष म्हणजे,  काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यती यासंदर्भात वटहुकूम काढून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती खुद्द वळसे पाटील यांनी दिली होती.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यूचा खेळ, ग्रामस्थांना तुडवतात गायी; पाहा VIDEO

बैलगाडा संदर्भात वटहुकूम काढून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. परंतु, हा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये चार ते पाच वेळा देशाच्या न्यायमूर्तीकडे अर्ज सादर केला आहे. ज्या वेळेला मुख्य न्यायमूर्ती 5 न्यायमूर्तींचे बेंच स्थापन करतील. त्यावेळी आपण आपले सर्वात उत्तम वकील देऊ एका बाजूला हा प्रयत्न आपण करू तर दुसऱ्या बाजूला कायद्यामध्ये काही सुधारणा करता येते का या दृष्टीकोनातून प्रयत्न करत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं होतं.

First published: