• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • तरुणाच्या डोक्यात दगडं-विटा घालून निर्घृण हत्या; पुण्यातील घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर

तरुणाच्या डोक्यात दगडं-विटा घालून निर्घृण हत्या; पुण्यातील घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर

Murder in Pune: पुण्यातील मांगडेवाडी याठिकाणी तरुणाच्या डोक्यात दगड-विटा घालून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपी तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 • Share this:
  पुणे, 21 मे: पुण्यातील मांगडेवाडी याठिकाणी तरुणाच्या डोक्यात दगड-विटा घालून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपी तरुणांच्या मुसक्या आवळल्या असून या हत्येचं कारण समोर आलं आहे. नव्यानं घेतलेल्या जमिनीवर वीज, पाणी (electricity and water) यांसारख्या सुविधा न दिल्यानं बदलेच्या भावनेतून हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक (2 Accused arrest) केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. विकास रमेश चव्हाण आणि सचिन जालिंदर डाकले असं या अटक केलेल्या दोन तरुणांची नाव असून दोघंही पुण्यातील कात्रज परिसरातील रहिवासी आहेत. तर हत्या झालेल्या 32 वर्षीय युवकाचं नाव मोहन संपत चवडकर असून तो नऱ्हे येथील एका कंपनीत कामाला आहे. यानं आरोपी चव्हाण आणि डाकले यांना काही दिवसांपूर्वी एक प्लॉट विकला होता. या प्लॉटसाठी वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यानं आरोपींनी कट रचून चवडकर याची हत्या केला आहे. नेमकी हत्या कशी झाली? मंगळवारी रात्री मृत मोहन चवडकर आपल्या घराशेजारी अर्धवट बांधकाम झालेल्या ठिकाणी आपल्या ओळखीच्या लोकांसोबत मद्यपान करत बसला होता. पण खूप रात्र झाल्यानंतरही चवडकर घरी आले नाहीत. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्यानं कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. तेव्हा चवडकर यांचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत ठेचलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर कुटुंबीयांनी या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. हे वाचा-बुलडाणा हादरलं! उशीनं तोंड दाबून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीला अटक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा तपास सुरू केला. यावेळी गुन्ह्याच्या तपास करत असताना दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकान शिरवळ फाटा याठिकाणी सापळा रचून दोन संशयितांना अटक केली. आरोपींनी पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबुल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: