मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune News: बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने डोक्यात केले वार

Pune News: बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने डोक्यात केले वार

Murder at Pune Bus Stop: रात्री उशीरा मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी बस न मिळाल्यानं बसस्टॉपवर झोपलेल्या (Passenger slept at bus stop) एका प्रवाशाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 जुलै: रात्री उशीरा मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी बस न मिळाल्यानं बसस्टॉपवर झोपलेल्या (Passenger slept at bus stop) एका प्रवाशाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.

संजय बाबू कदम असं हत्या झालेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते घाटकोपर येथील रहिवासी आहेत. मृत संजय कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी ते आपल्या घरी मुंबईला चालले होते. पण रात्री उशीर झाल्यानं त्यांना बस मिळाली नाही. त्यामुळे रात्रीचा मुक्काम बसस्टॉपवरच काढायचा त्यांनी ठरवलं. ते साधू वासवाणी चौकातून अंलकार चित्रपटगृहाकडे जाणार्‍या रस्त्यावरील विजय सेल्स या दुकानासमोरील बस स्टॉपवर झोपले होते.

हेही वाचा-धक्कादायक! गोड बोलून कारमध्ये बसवलं अन् निर्जनस्थळी नेत दांड्यानं केली मारहाण

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत, त्यांची हत्या केली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितलं की, मृत संजय कदम यांच्या खिशात एका मोबाईल नंबर आढळून आला होता. त्यावर संपर्क साधला असता मृताची ओळख पटली आहे. पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-महिलेच्या गळ्यातील सोनं चोरणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दिली भयंकर शिक्षा

खरंतर, पुणे स्टेशन परिसरात रात्री अपरात्री बाहेरगावावरून येणार्‍या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. आरोपी हत्यारांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटतात. त्यामुळे कदम यांची हत्या देखील चोरीच्या उद्देशातून झाली असावी, असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Crime, Maharashtra, Mumbai, Murder, Pune