पुण्यात खडकवासला सेल्फी पॉईंटची तोडफोड, 2 दिवसांपूर्वीच खा. सुप्रिया सुळेंनी केलं होतं उद्घाटन...

खडकवासला धरण चौपाटीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

खडकवासला धरण चौपाटीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
पुणे, 19 जून : खडकवासला धरण चौपाटीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 14 जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पण दोनच दिवसात 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कोरोना निर्बंधांमुळे या धरण परिसरात पर्यटकांना फिरायला बंदी आहे. खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वींच खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. आकर्षक विद्युत रोषणाई व धरणाच्या पाण्यात दिसणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब यामुळे रस्त्यावरुन येणारा-जाणारांना या ठिकाणी थांबण्याचा मोह आवरत नव्हता. हे ही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये मिळणार Lockdown दिलासा; सोमवारपासून निर्बंध होणार शिथिल आज सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता त्यांना या सेल्फी पॉईंटची तोडफोड झालेली दिसली. दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंच यांचा नामफलक तोडण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच सरपंच सौरभ मते व इतर पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीची पाहणी केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून हवेली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सौरभ मते यांनी सांगितले." हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. खडकवासला गावच्या अस्मितेवर झालेला हा हल्ला सहन केला जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून हे दूशकृत्य करणारे शोधून काढावेत" अशी विनंती ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना केली आहे. याबाबत खडकवासला गावचे सरपंच म्हणाले, "आदरणीय खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून वेळ काढून या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले. त्यानंतर समाज माध्यमांवर अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले, परंतु समाजकंटकांनी रात्रीत या वास्तूची तोडफोड केली. ग्रामस्थांच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध केला जात आहे. पोलिसांना याबाबत सखोल तपास करण्याची विनंती करणार आहे."
Published by:Meenal Gangurde
First published: