पुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO

पुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO

नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. धक्कादायक म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते

  • Share this:

पुणे, 15 सप्टेंबर: पुण्यातीत भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा झाला. टेस्ट किट संपल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर नागरिकांचा ताबा सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला. एवढंच नाही तर संतप्त नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले.

हेही वाचा...Corona Vaccine कधी येणार? आता बिल गेट्स यांनी सांगितली वेळ

मिळालेली माहिती अशी की, भारती विद्यापीठ समोरील कोविड टेस्टिंग सेंटरवर नागरिक सकाळपासून कोविड टेस्टसाठी रांगेत उभे होते. मात्र, दुपारी टेस्ट किट संपल्याचे नागरिकांना सांगण्यात आलं. हे ऐकून संतापलेल्या नागरिकांचा पारा आखणी चडला. नागरिकांनी सेंटरवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांशी वादावादी केली. नागरिकांनी टेबलवर ठेवलेले स्वॅब सॅम्पल खाली फेकून दिले. धक्कादायक म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे देखील स्वॅब होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पुणे महापालिकेकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, पुण्यातल्या आंबेगाव येथील लक्ष्मीबाई हजारे वस्तीगृह येथे टेस्ट केल्या जात होत्या. तिथे  अँटीजेन किट संपल्यामुळे आमची टेस्ट आधी करा, अशी मागणी करत काही नागरिकानी स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात घेतलेले स्वॅबही लाथा मारून खाली पाडून दिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन नागरिकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना स्वॅब टेस्टिंगसाठी टार्गेट दिल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसचे गट नेते यांनी केला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना परिस्थितीत महापालिकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पण ऐन कोरोनाच्या काळात पुणे विभागातील आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यात शल्य चिकित्सक, भूलतज्ज्ञ अशा महत्त्वाच्या जागांचाही समावेश आहे.

पुणे पालिकेने टप्प्या टप्प्याने भर्ती सुरू असल्याचे सांगत कोविड सेंटरवर जोर दिला. तर पालिका स्वतःची रुग्णालये सक्षम करणे, त्यातील रिक्त जागा भरणे याकडे दुर्लक्ष करत जम्बो घोळ घालत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे.

पुण्यात कोरोना रुग्ण बाधितांचा दर अर्थात पॉझिटिव्ह रेट 30 टक्के इतका पोहोचला आहे. राज्य सरकार आणि पालिका यांच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेले जम्बो रुग्णालय आता रुळावर येत असलं तरी तिथं प्रशासकीय गोंधळ सुरू आहे.

यातच पालिकेच्या रुग्णालये सक्षम नसणे, आरोग्य विभागाच्या 750 जागा रिक्त असणे डॉक्टर्स, प्रशिक्षित स्टाफची कमतरता, यामुळे कोरोनाला अटकाव घालणे कठीण होत चालले आहे. मात्र, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणता की, 'भरती सुरूच आहे'. तसंच पालिकेच्या 17 कोविड सेंटर्समधून 50 हजार पुणेकर बरे झाले, असा ही दावा त्यांनी केला आहे.

विरोधकांना हे दावे मान्य नाहीत. 3 वर्षे आरोग्य विभागाची भरती रखडली तरी सत्ताधारी गप्प का? जम्बो कोविड सेंटर मध्ये 800 ऐवजी 185 बेड्सचं उपलब्ध का? पालिकेची रुग्णालयांची खस्ता हाल का आणि असं असून ब्लेम गेम का असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप आणि आम आदमी पार्टीचे अभिजीत मोरे यांनी उपस्थित करत आहे.

हेही वाचा..दिलासादायक! अखेर 6 दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला

जम्बो हॉस्पिटल करता पालिकेला 46 कोटी रुपये द्यायचे आहेत. डॉक्टर्स, नर्सेससह प्रशिक्षित स्टाफ यायला तयार नाही. पालिकेचे उत्पन्नाचे मार्ग खुंटले आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशात कोरोना रुग्ण बाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे राजकारण बाजूला ठेवत पालिकेने सर्व रिक्त जागा लवकरात लवकर जागा भरल्या पाहिजेत आणि राज्य सरकारनंही याकरता आर्थिक निधीसह सर्व मदत केली पाहिजे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading