पुणेकरांसाठी 2 मोठ्या बातम्या; सर्व बंधनं उठणार, कपात टळणार
पुणेकरांसाठी 2 मोठ्या बातम्या; सर्व बंधनं उठणार, कपात टळणार
लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर असा शुकशुकाट पाहायला मिळत होता. पण आता कोरोनाची धास्ती घेतलेल्या पुण्याबाहेरच्या लोकांनी स्टेशनवर केलेल्या गर्दीचं वेगळंच चित्र दिसत आहे.
पाणी आणि खरेदी याबाबत पुणेकरांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय आज महापालिकेने घेतले आहेत.
पुणे, 4 ऑगस्ट : पुणेकरांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय आज महापालिकेने घेतले आहेत. Coronavirus मुळे लागू असलेला लॉकडाऊन प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असला तरी अन्य सर्व शहर खुलं केलं जाणार आहे. दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखेचं बंधन आता नसेल. शिवाय दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पुणेकरांवर असलेली पाणीकपातीची टांगती तलवारसुद्धा सध्यापुरती हटवण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने दोन महत्त्वाचे निर्णय घेत आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्याच्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती. पण तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुकानदारांच्या मागणीला यश
पुण्यातली दुकानं एक दिवसाआड सम आणि विषम तारखांप्रमाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता लवकरच हे बंधनही उठवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त यासंंबंधी आदेश लवकरच काढतील. शहरातली सर्व दुकानं सकाळी 9 ते 7 या वेळेत सुरू राहणार आहे.
आयुक्त विक्रमकुमार यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला दाद देत हा निर्णय घेतला आहे. पुण्यात COVID ची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. पण लॉकडाऊनचे नियम मात्र शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत नुकतीच दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली. आता मुंबईनंतर पुण्यातही दुकाने उघडण्यासाठी सम-विषमचे असलेले बंधन उठविण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.