मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

BREAKING : पुणे विमानतळ 15 दिवसांसाठी राहणार बंद!

BREAKING : पुणे विमानतळ 15 दिवसांसाठी राहणार बंद!


यापूर्वीही रनवेच्या कामानिमित्त काही दिवस पुणे लोहगाव विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.

यापूर्वीही रनवेच्या कामानिमित्त काही दिवस पुणे लोहगाव विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.

यापूर्वीही रनवेच्या कामानिमित्त काही दिवस पुणे लोहगाव विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.

पुणे, 05 ऑक्टोबर : पुणे विमानतळाबाबत (pune lohegaon airport) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील धावपट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुणे लोहगाव विमानतळा पंधरा दिवसांसाठी बंद राहणार आहे. येत्या 16 ते 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे पुणे विमानतळ (Pune Airport) च्या बाहेर चालणारी उड्डाणे 16 ऑक्टोबर 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत 14 दिवस बंद राहणार आहे.

यापूर्वीही रनवेच्या कामानिमित्त काही दिवस पुणे लोहगाव विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. इंडियन एअर फोर्सच्या अखत्यारित रनवे येतो. रनवे चे रि-कार्पेटिंग करायचे आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी विमानतळ बंद राहणार आहे.

धोक्याची घंटा! पाकिस्तान-अफगाण सीमेवर भरतोय शस्त्रास्त्रांचा ‘बुश बाजार’

रनवेच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज यापूर्वीच करण्यात येणार होते. परंतु, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन होते. त्यानंतर काही काळाने टप्प्या टप्प्याने देशांतर्गत विमान सेवेसाठी विमानतळ खुले करण्यात आले. त्यातच पुण्यातूनच संपूर्ण देशभरात तसंच परदेशातही कोविडशिल्ड या लशीचे डोस वितरीत करण्यात येत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे रनवेचे काम लांबले होते.

Government Jobs: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी सोलापूर इथे मोठी पदभरती

दरम्यान, पंधरा दिवसांसाठी प्रवासी विमानांची ये-जा थांबणार आहे. पंधरा ऑक्टोबरला रात्रीची शेवटची फ्लाईट असेल. त्यानंतर सोळा तारखेपासून पुढील पंधरा दिवस विमानतळ बंद राहणार आहे, असं लोहगाव विमानतळाचे एअरपोर्ट डायरेक्टर संतोष ढोके यांनी सांगितलं.

First published: