पुणे, 2 एप्रिल : पुणे - पानशेत रस्त्यावर मन सुन्न करणारी अशी एक घटना घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एका कारला झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. पानशेतकडून पुण्याकडे येणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये कार कोसळली. मृतांमध्ये आई आणि तीन मुलींचा समावेश आहे. केवळ वडील या अपघातातून बचावले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती.
#PuneAccident खडकवासल्याच्या बॅकवॉटरमध्ये कोसळली भरधाव कार. अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुली आणि आईचा मृत्यू. वडील मात्र बचावले. स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करत चौघींचे मृतदेह बाहेर काढले. चालकाला वाचवण्यात यश आलं आहे. पानशेतकडून पुण्याला येताना अपघात pic.twitter.com/8nCrYKbgHe
— News18Lokmat (@News18lokmat) April 2, 2021
पुणे पानशेत रस्त्यावर कुरण फाट्याजवळ हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातीत सदस्य सँट्रो कारमध्ये पानशेतकडून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. या अपघातामध्ये कारमधील चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. चालकाला म्हणजे वडिलांना वाचविण्यात यश आलं आहे. घटनास्थळी वेल्हे पोलीस ठाण्याच्या पानशेत दुर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं.
दुर्घटनेत वडिलांना वाचवण्यात यश आलं असलं तरी एकाच कुटुंबातील तीन मुली आणि आई अशा चार जणींचा मृत्यू झाला आहे. अल्पना विठ्ठल भीकुले (45), मुलगी प्राजक्ता (21), प्रणिता (17) आणि वैदेही (8) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यात विठ्ठल केशव भिकुले (46) हे बचावले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.