धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स न आल्याने पुण्यात रस्त्यावरच पत्नी-मुलासमोर रुग्णाने सोडला जीव

धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स न आल्याने पुण्यात रस्त्यावरच पत्नी-मुलासमोर रुग्णाने सोडला जीव

'पुणे तिथे काय उणे' असं बिरुद मिरवणाऱ्या पुण्यात एक नामुष्कीजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 16 मार्च: 'पुणे तिथे काय उणे' असं बिरुद मिरवणाऱ्या पुण्यात एक नामुष्कीजनक घटना समोर आली आहे. आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी वारंवार संपर्क साधूनही अ‍ॅम्ब्युलन्स न आल्यानं एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा.. घातपाताचा मोठा कट उधळला, 4 आयडी स्फोटकांसह 3 पेट्रोल बॉम्ब जप्त

पुण्यातील नाना पेठेत शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. यशूदास मोती फ्रान्सिमस (वय-54) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पुणे शहर रेड झोनमध्ये आहे. शहरातील हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. त्यात नानापेठही आहे. याच परिसरात ही नामुष्कीजनक घटना घडली.

नाना पेठमध्ये राहणारे यशूदास मोती फ्रान्सिस यांची प्रकृती गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खालावली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने फ्रान्सिस कुटुंबीयांनी तब्बल अडीच तास आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी संपर्क साधला. यादरम्यान, यशूदास मोती फ्रान्सिस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी  डुल्या मारोती चौकात आणलं होतं. एवढंच नाही तर शेजारी पोलिस चौकी असूनही फ्रान्सिस कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणीही आलं नाही.

हेही वाचा.. राज्यात घरपोच मद्यविक्रीला सुरुवात, पहिल्याच दिवशी मिळाला तुफान प्रतिसाद

नंतर 100 व 108 या क्रमांकावर संपर्क साधून अ‍ॅम्ब्युलन्सची मागणी केली. मात्र समोरुन धक्कादायक उत्तर मिळालं. कोरोनामुळे अ‍ॅम्ब्युलन्स मिळणार नाही, असं स्पष्ट सांगण्यात आलं. अखेर अ‍ॅम्ब्युलन्स न आल्यानं उपचाराअभावी यशूदास मोती फ्रान्सिस यांची रस्त्यावरच प्राणज्योत मालवली. पावणे पाच वाजता भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून फ्रान्सिस यांना ससून हॉस्पिटलमघ्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

First published: May 16, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading