Home /News /pune /

लायकी नाही! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नाव न घेता कंगना आणि भाजपवर निशाणा

लायकी नाही! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नाव न घेता कंगना आणि भाजपवर निशाणा

नाव घेणार नाही, तिची लायकी नाही. पण मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी ( pok) करते. मुंबई पोलिसांना माफिया म्हणते

पुणे, 20 सप्टेंबर: राज्याचे गृहमंत्रा अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपसह बॉलिबूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर निशाणा साधला आहे. नाव घेणार नाही, तिची लायकी नाही. पण मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी ( pok) करते. मुंबई पोलिसांना माफिया म्हणते, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता कंगनाचा समाचार घेतला आहे. तसेच तिला एका राजकीय पक्ष फायद्यासाठी पाठबळ देतो, हे अत्यंत खालच्या थराचे आहे, अशी टीका गृहमंत्र्यांनी भाजपवर केली आहे. गंभीर विषय असल्याचं सांगत नागरिकांनीही याची दखल घ्यावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. हेही वाचा...नात्याला काळिमा! नराधम पतीचं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य पुण्यात राज्य पत्रकार संघातर्फे पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गृहमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना गृहमंत्र्यांनी नाव न घेता कंगना आणि भाजपवर निशाणा साधला. IPS अधिकाऱ्यांनी खरंच ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला? दरम्यान, 'राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते', असा गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. पण, आता अनिल देशमुख यांनी याबद्दल वेगळाच खुलासा केला आहे. 'मी असं काही म्हटल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मात्र, अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात अनौपचारिक भेट देशमुख यांनी दिली. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा इन्कार करताना देशमुख म्हणाले, 'एका वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली ती निराधार आहे. मी असं कुठेही म्हटलो नाही. या मुलाखतीचा व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ पाहिला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.' काय म्हणाले होते अनिल देशमुख? दैनिक लोकमत ऑनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा खुलासा केला होता. 'काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे. जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही', असं सांगत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'अशी माहिती समोर आली की, चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले. हेही वाचा...देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे... ढसाढसा रडत चिमुरड्यानं घातलं साकडं एवढंच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहे. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते', अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Anil deshmukh, Kangana ranaut, Pune police

पुढील बातम्या