मराठी बातम्या /बातम्या /पुणे /BREAKING : मराठा समाजासाठी मोठी बातमी, उदयनराजे आणि संभाजीराजेंची आज पुण्यात भेट!

BREAKING : मराठा समाजासाठी मोठी बातमी, उदयनराजे आणि संभाजीराजेंची आज पुण्यात भेट!

खासदार संभाजीराजे छत्रपती व छत्रपती उदयनराजे यांची आज पुणे येथे दुपारी 1 वाजता भेट होणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती व छत्रपती उदयनराजे यांची आज पुणे येथे दुपारी 1 वाजता भेट होणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती व छत्रपती उदयनराजे यांची आज पुणे येथे दुपारी 1 वाजता भेट होणार आहे.

पुणे, 14 जून: मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिली असून राज्यभर दौरा करत आहे. पण आता या लढाईला नवे वळण मिळणार आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची आज पुण्यात भेट होणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती व छत्रपती उदयनराजे यांची आज पुणे येथे दुपारी 1 वाजता भेट होणार आहे. पुण्यातील औंध बॅनर रोडवर असलेल्या एका बंगल्यात ही भेट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजे एकत्र का नाही असे सवाल उपस्थितीत केले जात होते. पण, आता दोन्ही राजे आज भेटणार असून मराठा आरक्षणाला लढ्याला नवे वळण मिळणार का याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विशेष म्हणजे, आज सकाळी कोल्हापूरमध्ये  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे.

संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अन् अजित पवार पोहोचले न्यू पॅलेसवर, PHOTOS

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी 16 तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

First published:
top videos