पुन्हा अतिवृष्टी.. पुण्यात मुसळधार पाऊस, या भागात पाणीच पाणी...

पुन्हा अतिवृष्टी.. पुण्यात मुसळधार पाऊस, या भागात पाणीच पाणी...

पुणे आणि नाशिकमध्येही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

पुणे,3 नोव्हेंबर: पुणे शहराच्या पूर्व भागाला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले आहे. सिंहगड रस्ता, हडपसर, वानवडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर कालावधीत मध्य महाराष्ट्र, तळ कोकण आणि सौराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. पश्चिम किनारपट्टीवर समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पुढचे 5 दिवस वादळी पावसाचे..

नोव्हेंबरची सुरुवातही पावसाने झाली. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुणे आणि नाशिकमध्येही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

क्यार वादळाचा प्रभाव कमी होतोय न होतोय तोवर दुसरं चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. महा नावाचे हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकायचा धोका नसला, तरी त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात वादळी पाऊस होत राहणार आहे. स्कायमेट हवामानतज्ज्ञांच्या मते,चक्रीवादळ महा आता तीव्र चक्रीवादळात रुपांतरित झाले आहे. चक्रीवादळ वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळी ते अतितीव्र चक्रीवादळ झाले आहे. याचा परिणाम म्हणजे मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. नाशिकमध्येही काही भागात जोरदार पाऊस झाला. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. पुण्यालाही पावसाने झोडपून काढले. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर येत्या 24 तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच कर्नाटकच्या किनारी भागांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळी वातावरण कमी होईल.

3 नोव्हेंबरनंतर हवामान प्रणाली आणखी दूर गेलेली असेल. त्यामुळे समुद्राची परिस्थिती देखील सुधारण्यास सुरूवात होईल आणि वाऱ्याचा वेग देखील कमी होऊ लागेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. मुंबई, पुणे परिसरात 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहील आणि दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता असेल असा भारतीय हवामान विभागाचा IMD अंदाज आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टीसाठी 3 नोव्हेंबरपर्यंत खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच मच्छीमार बांधवांनी किमान 7 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या