मराठी बातम्या /बातम्या /पुणे /विद्यार्थ्यांच्या बसचं ब्रेक फेल, चालकाने धावत्या बसमधून उडी मारली अन्.., पुण्यातील थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

विद्यार्थ्यांच्या बसचं ब्रेक फेल, चालकाने धावत्या बसमधून उडी मारली अन्.., पुण्यातील थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं ब्रेक अचानक फेल झालं. या बसमध्ये 34 विद्यार्थी होते.

बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं ब्रेक अचानक फेल झालं. या बसमध्ये 34 विद्यार्थी होते.

बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं ब्रेक अचानक फेल झालं. या बसमध्ये 34 विद्यार्थी होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 5 फेब्रुवारी :  पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं अचानक ब्रेक फेल झालं. या बसमधून 34 विद्यार्थी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून, सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात  असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात हा अपघात घडला आहे.

बसमध्ये 34 विद्यार्थी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचं अचानक ब्रेक फेल झालं. या बसमध्ये एकूण  34 विद्यार्थी होते. वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात  असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगड लावल्यानं बस नियंत्रणात आली आणि मोठा अपघात टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद  

मोरगावमधील खासगी क्लासच्या 34 विद्यार्थ्यांना घेऊन बस क्रमांक MH12HC9119 ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला निघाली होती. मांढरदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भोरच्या चौपाटी जवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्यान बसचे ब्रेक निकामी झाले. बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकाने धावत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकल्यानं बसवर नियंत्रण मिळवण शक्य झालं. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 34 विद्यार्थांचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

First published:

Tags: Pune, Pune news