मुलांचा साडी डे आणि मुलींचा टाय डे : पुण्याच्या कॉलेजमधला विलक्षण प्रकार; फोटो एकदा बघाच!

मुलांचा साडी डे आणि मुलींचा टाय डे : पुण्याच्या कॉलेजमधला विलक्षण प्रकार; फोटो एकदा बघाच!

Fergusson college च्या विद्यार्थ्यांनी साडी फक्त मुलींनी नेसायची असा काही नियम नाही, असं म्हणत साडी परिधान केली.

  • Share this:

अद्वैत मेहता

पुणे, 2 जानेवारी : नवीन वर्ष सुरू झालं की महाविद्यालयात वेगवेगळे डेज साजरे करण्याची सुरुवात होते. यात सर्वात लोकप्रिय असतो Traditional Day  आणि साडी डे- टाय डे. म्हणजे या दिवशी मुली साड्या नेसून मिरवतात, तर कॉलेज कुमार सगळे टाय सूट- बूट अशा पेहरावात मिरवताना दिसतात. हे दरवर्षी कुठल्याही कॉलेजमध्ये दिसू शकेल असं दृश्य. पण या वेळी पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये थोडं वेगळं चित्र दिसलं. विलक्षणच प्रकार पाहायला मिळाला. फर्गसन कॉलेजातल्या 3 मुलांनी ही साडी डेची नेहमीची प्रथा मोडायची ठरवली. मुलांनी साडी आणि मुलींनी टाय सूट असा पेहराव करायचा ठरला.

फर्गसनच्या आकाश पवार, सुमित होनवडकर आणि ऋषीकेश सानप या तीन विद्यार्थ्यांनी साडी फक्त मुलींनी नेसायची असा काही नियम नाही, असं म्हणत साडी परिधान केली.

याविषयी बोलताना या विद्यार्थ्यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. स्त्री समजून घ्यायची असेल, स्त्री पुरुष समानता  प्रत्यक्षात आणायची तर ही छोटी कृती आवश्यक आहे, असं या तरुणांचे म्हणणं आहे. फर्गसन कॉलेजला गोपाळ गणेश आगरकर यांच्या आधुनिक विचारांचा वारसा आहे. या तरुणाईने त्याच वारशाची आठवण ठेवत जुन्या प्रथा परंपरा मोडत एक धाडसी पाऊल टाकत कृती केली आहे.

2 वर्षांपूर्वी मेळघाटात एका शिबिरात दिशा पिंकी शेख यांनी तरुणांना स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारता, मग साडी नेसून दाखवाल का, असा सवाल विचारला. फर्गसन कॉलेजच्या सचिन या युवकाने हे आव्हान स्वीकारलं. मात्र 2 वर्षापूर्वी कॉलेजात मुलांनी साडी नेसली म्हणून नाकं मुरडली गेली, टोमणे मारले गेले. मात्र हार न मानता यंदा या तीन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा साडी नेसायची ठरवली.

जुनी प्रथा मोडून काढण्यासाठी आणि नवी परंपरा सुरू करण्यासाठी या तरुणांच्या मदतीला धावली त्यांचीच कॉलेजमधील मैत्रीण श्रध्दा देशपांडे. श्रद्धाने साडी नेसायला मदत केलीच शिवाय स्वतः सूट टाय घालून मुलांनीच सूट बूट टाय परिधान करायचा या प्रथेलाही फाटा दिला.

भरीस भर म्हणून LGBT समुदायातील दिपांकर उषा बॅनर्जीने ट्रान्सजेंडर ओळख न लपवता पेहराव करत वेगळा आयाम या traditional डेला दिला.

--

अन्य बातम्या

अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस? काँग्रेस नेत्याचं Tiktok स्टाईल उत्तर

मोदी-शहांना रोखण्यासाठी शरद पवारांनी सुचवला 'नवा पॅटर्न'!

तो VIDEO VIRAL झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी मागितली माफी

राणू मंडलनंतर पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल झाला सोशल मीडियाचा हिरो, गाण्याची चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 07:03 PM IST

ताज्या बातम्या