Home /News /pune /

4 वर्ष प्रेमसंबंध, जातीमुळे लग्न टाळलं अन् तिचं लग्न ठरलं, तर तिच्याच भावी पतीला जाऊन सगळं सांगितलं, अखेर...

4 वर्ष प्रेमसंबंध, जातीमुळे लग्न टाळलं अन् तिचं लग्न ठरलं, तर तिच्याच भावी पतीला जाऊन सगळं सांगितलं, अखेर...


लग्न झाल्यानंतर प्रशांत हा सुधारेलअशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होता. पण, घडले उलटेच.

लग्न झाल्यानंतर प्रशांत हा सुधारेलअशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होता. पण, घडले उलटेच.

लग्न झाल्यानंतर प्रशांत हा सुधारेल अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होता. पण, घडले उलटेच.

पुणे, 12 ऑक्टोबर : प्रेमभंग झाल्यावर प्रियकर (boyfriend) कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. पुण्यात एक अशीच घटना घडली आहे. प्रेमात काडीमोड ( break up) घेतल्यानंतर प्रियकराने लग्न केलं. पण, प्रेयसीचं (girlfriend ) लग्न होत असताना पठ्ठ्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेमसंबंधाची माहिती दिली. त्यामुळे प्रेयसीचे लग्न मोडले. पण प्रेयसीनेही या प्रियकराला असा धडा शिकवला की पार जेलची वारीच घडवली. पुण्यातील  सिंहगड (sinhgad pune) रस्ता परिसरात हा प्रकार घडला. प्रशांत हगवणे (prashant hagavane) असं या आरोपीचं नाव आहे.  एका 21 वर्षीय तरुणीची आणि आरोपी प्रशांत हगवणे यांची फेसबुकवरून ओळख झाली होती. फेसबुकवरून चॅटिंग करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मागील चार वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एवढंच नाहीतर दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. अय्यो! भल्या पहाटे टॉयलेटमध्ये घुसली महिला, समोरचं चित्र पाहून किंचाळत आली बाहेर पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा  मुलीची जात आडवी आली.  प्रशांतच्या घरच्यांनी मुलीसोबत लग्न लावून देण्यास नकार दिला.  प्रशांतचे घरचे लग्नाला तयार होत नसल्यामुळे तरुणीही हतबल झाली होती.  त्यानंतर प्रशांतच्या घरच्यांनी सहा महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न नात्यातल्याच एका मुलीसोबत लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतर प्रशांत हा सुधारेलअशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होता. पण, घडले उलटेच. त्यानंतरही प्रशांत पीडित मुलीला त्रास देतच राहिला. तरुणीच्या घरच्यांनी प्रशांतपासून पिच्छा सोडवण्यासाठी तरुणीचे लग्न लावून द्यायचे ठरवले. पण, तो तिला वेगवेगळ्या  नंबरवरून फोनकरून तिच्यावर दबाव टाकत होता, अश्लील बोलत होता. एवढंच नाहीतर तिच्या कुटुंबीयांनाही धमकी देत होता. आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही जीवघेणा ठरणारा दुधी कसा ओळखायचा ? अखेर तरुणीचं लग्न ठरलं. याची माहिती प्रशांतला कळताच त्याने कहरच केला. प्रशांतने थेट प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला जाऊन भेटला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर प्रेयसीविरोधात उलट-सुलट सांगितलं. आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल ही माहिती ऐकल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचललं आणि तिच्यासोबत लग्न मोडलं. प्रशांतचा हा प्रताप जेव्हा त्याच्या प्रेयसीला आणि तिच्या कुटुंबीयांना कळाला. तेव्हा त्यांनी थेट हवेली पोलीस स्टेशन गाठले. प्रशांतच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रशांतला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: पुणे

पुढील बातम्या