Home /News /pune /

आधी प्रेयसीला हॉटेलमध्ये जेवू घातले अन् नंतर केले चाकूने सपासप वार, पुण्यातील घटना

आधी प्रेयसीला हॉटेलमध्ये जेवू घातले अन् नंतर केले चाकूने सपासप वार, पुण्यातील घटना

सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. तर रामकिसन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता.

सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. तर रामकिसन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता.

सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. तर रामकिसन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता.

पुणे, 13 सप्टेंबर : किरकोळ वादातून प्रियकराने (Boyfriend ) आपल्या प्रेयसीवर (girlfriend ) चाकूने सपासप (knife attack) वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ घडली होती. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याजवळ घडली होती. सपना दिलीप पाटील (वय 32, रा. पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर, कात्रज) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर रामकिसन गिरी (वय 36, रा. परभणी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. IND vs ENG : टीम इंडियाच्या इमानदारीवर प्रश्न, 'विराट कोहलीने अर्ध्या रात्रीच... सपना कात्रज येथील रिलायन्स मार्टमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होती. तर रामकिसन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्यांचे मागील 5 ते 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणं झाली होती. दरम्यान, रविवारी रामकिसनने  प्रवासी कार भाड्याने घेऊन रिलायन्स मार्ट येथे जाऊन सपनाला जेवण करण्यासाठी बाहेर नेलं. त्यानंतर त्याने कार चालकास नवले पूलापासून कात्रज नवीन बोगद्याकडे गाडी घेऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर घटनास्थळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर रामकिसनने त्याने त्याच्याकडील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. त्यानंतर रामकिसन तेथून पळाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपनाला कार चालकाने शिंदेवाडी येथील रुग्णालयात नेले. तेथून तिला उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी तिचा मृत्यू झाला. नातेही विसरला नराधम, 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार, भिवंडीतील घटना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस तत्काळ घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून रामकिसन यास अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Murder, Pune crime, पुणे, प्रेयसी

पुढील बातम्या