News18 Lokmat

दारुच्या नशेत खाल्ली कबुतराची अंडी, काही वेळातच केली आत्महत्या

एका तरुणाने मद्यासोबत खाण्यासाठी काही मिळालं नाही म्हणून दारूच्या नशेत गॅलरीत असलेल्या कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट करून खाल्ल्याचा प्रकार विमाननगरमध्ये घडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2018 10:08 AM IST

दारुच्या नशेत खाल्ली कबुतराची अंडी, काही वेळातच केली आत्महत्या

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 20 डिसेंबर : एका तरुणाने मद्यासोबत खाण्यासाठी काही मिळालं नाही म्हणून दारूच्या नशेत गॅलरीत असलेल्या कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट करून खाल्ल्याचा प्रकार विमाननगरमध्ये घडला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरानंतर तरुणाने आत्महत्या केली आहे.

कबुतराची अंडी खाल्ल्यानंतर तरुणाने त्यावर मद्यप्राशन केलं. नंतर त्याने विचित्र वागण्यास सुरुवात केली. यानंतर थेट 8व्या मजल्यावरून उडी मारून या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विचित्र प्रकारामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे.

तुहीन मुखोपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयत तुहीन हा मूळचा बंगालचा आहे. विमाननगर परिसरातील एका इमारतीत तो पत्नीसह भाड्याने राहतो. वोडाफोन कंपनीत तो कामाला होता.

मंगळवारी रात्री कामावरून परत आल्यानंतर तो दारू पिण्यासाठी बसला. पण त्याला चखण्यासाठी काही मिळालं नाही त्यामुळे त्याने घरातील बालकनीत असलेल्या कबुतराच्या घरट्यातील अंडी काढून त्याचं ऑम्लेट करून खाल्लं आणि त्यावर मद्य प्राशान केलं. यानंतर काही वेळातच तो विचित्रपणे वागू लागला अशी माहिती मयत तुहीनच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.

Loading...

दारुच्या नशेत घरातच तुहीन इकडून तिकडे धावत होता. त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने बालकनीत जाऊन 8व्या मजल्यावरून थेट उडी मारली. पत्नीने ही माहिती शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

दरम्यान विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी तुहीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. तर त्याच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.


Special Report: कमलनाथांच्या वक्तव्याने काँग्रेसची गोची, मनसेचा 'मौके पें चौका'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 09:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...