शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी, पुण्यातील धक्कादायक घटना

शौचास गेलेल्या महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी, पुण्यातील धक्कादायक घटना

या क्रूर कृत्यानं महिलांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण

  • Share this:

पुणे, 4 नोव्हेंबर: घराच्या बाजूला शौचास गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीनं विनयभंग करण्याच्या हेतूनं प्राणघातक हल्ला करून तिचे दोन्ही डोळे निकामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात न्हावरे गावात ही घटना घडली आहे. या क्रूर कृत्यानं न्हावरे परिसरात महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा..पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

न्हावरे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला. महिला घराच्या बाजूला शौचास गेली असता तिच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे, अज्ञात हल्लेखोराविरुद्ध शिरूर पोलिसांनी विनयभंग करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला 37 वर्षांची असून ती आपल्या पतीसमवेत न्हावरे येथील पत्र्याच्या खोलीत वास्तव्य करते. मंगळवारी महिला रात्री नऊच्या सुमारास घराच्या बाजूला शौचास गेली होती. त्यावेळी बाजूला असणाऱ्या झुडपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीनं तिची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर प्राणघातक हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले.

हेही वाचा...आई-वडिलांनीच झुडपात नेऊन पोटच्या मुलीचा ओढणीनं आवळला गळा, तितक्यात..

घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळाची बुधवारी दुपारी पाहणी केली. महिलेवर झालेला जीवघेणा हल्ला का व कशासाठी केला, याचा तपास शिरूर पोलिसांकडून सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 8:30 PM IST
Tags: pune crime

ताज्या बातम्या