मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Video : सीमाप्रश्नी निषेधाची पुणेरी पद्धत! राष्ट्रवादी नेत्याकडून इडली, डोसावर बहिष्काराची घोषणा

Video : सीमाप्रश्नी निषेधाची पुणेरी पद्धत! राष्ट्रवादी नेत्याकडून इडली, डोसावर बहिष्काराची घोषणा

कर्नाटक सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं इडली सांभार आणि मसाला डोसावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 9 डिसेंबर : एखाद्या गोष्टीचं कौतुक करणे किंवा त्याचा निषेध करण्याची पुणेकरांची एक खास शैली आहे. या शैलीमुळे त्यांची जगभर चर्चा होत असते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सध्या चांगलाच पेटलाय. कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा राज्यात सर्वच स्तरातून निषेध होत आहे. मोर्चा, आंदोलन, घोषणाबाजी या माध्यमातून हा निषेध व्यक्त होतोय. अगदी संसदेतही मराठी खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचवेळी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानी या विषयावरही निषेध करण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे.

दाक्षिणात्य पदार्थावर बहिष्कार

कर्नाटक सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही इडली सांबार आणि मसाला डोसा या दाक्षिणात्य पदार्थावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी केली आहे. पुण्यातील वाडेश्वर कट्टा या साप्ताहिक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

Sangli : पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video

पुणे शहरातील फर्ग्युसन रस्त्यावरील वाडेश्वर या हॉटेलमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाडेश्वर कट्टा हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील लोक गप्पा मारणे, विविध विषयाची चर्चा करणे आणि वाडेश्वर मधील चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे असा हा उपक्रम असतो.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादामुळे विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असताना अंकुश काकडे यांनी या पद्धतीचा पुणेरी पद्धतीनं निषेध केला आहे.  महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असून त्याबाबत कर्नाटक सरकारने खोड काढणे उचित नाही. त्यांच्या या धोरणारा निषेध म्हणून आम्ही दाक्षिणात्य पदार्थांवर बहिष्कार टाकत आहोत.  कर्नाटक सरकार याचा विचार करेल. ते  महाराष्ट्राच्या वाटेला जाणार नाही अशी अपेक्षाही काकडे यांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Karnataka government, Local18, NCP, Pune