Elec-widget

अभिनेत्री साराला अखेर अटक, 'या' अभिनेत्याविरूद्ध केली विनयभंगाची खोटी तक्रार

अभिनेत्री साराला अखेर अटक, 'या' अभिनेत्याविरूद्ध केली विनयभंगाची खोटी तक्रार

अभिनेत्याविरूद्ध कटकारस्ठान करून विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ती मागे घेण्यासाठी उकळली मोठी खंडणी...

  • Share this:

पुणे,1 डिसेंबर: पुणे, 1 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सारा श्रवण (वय-32) हिला अखेर रविवारी पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. अभिनेत्याविरूद्ध कटकारस्ठान करून विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ती मागे घेण्यासाठी मोठी खंडणी उकळल्याची सारा हिच्यावर आरोप आहे. पुणे जिल्हा व सत्र कोर्टाने सारा हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर क्राईम ब्रॅंचने ही कारवाई केली आहे. सारा हिला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे हे प्रकरण?

'रोल नंबर 18' या सिनेमाचा अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांच्यावर 'रोल नंबर 18' मध्ये काम केलेली अभिनेत्री रोहिणी माने हिने वॉशरूममध्ये छेड काढल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर यादवविरुद्ध पोलिसांत विनयभंगाची तक्रारही दाखल केली होती. हा प्रकार 28 सप्टेंबर 2018 रोजी सहकार नगर येथे घडला होता. याकामात रोहिणीला साराने मदत केली. नंतर या दोघींनी सुभाष यादव यास ब्लॅकमेल केले. सुभाष यादव यांनी 15 लाख रुपयांची खंडणी मागितले. काही रक्कम घेतल्यानंतर उर्वरित रक्कम मिळत नसल्याने बदनामी करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

मात्र, हे आपल्याविरोधात कटकारस्थान असल्याचे लक्षात येताच सुभाष यादव यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली होती. सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहिणी माने हिच्यासह सारा श्रवण हिच्याविरुद्ध सहकार नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अभिनेत्री रोहिणी माने (रा.दहिटना, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), गुंड राम भरत जगदाळे (रा. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु, अभिनेत्री सारा ही दुबईला पसार झाली होती. अभिनेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com