Home /News /pune /

BMCच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा, राज्यपालांचे लोकायुक्तांना चौकशीचे आदेश, अजित पवार म्हणाले...

BMCच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा, राज्यपालांचे लोकायुक्तांना चौकशीचे आदेश, अजित पवार म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

Ajit Pawar reaction on Governor Bhagatsingh Koshyari ordered inquiry in BMC Ashrya Yojana scam: बीएमसीच्या आश्रय योजनेत झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशीचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत.

पुणे, 2 जानेवारी : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यातील संघर्ष सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या लेटर वॉर नंतर आता राज्यपालांनी शिवसेनेला एक मोठा झटका दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेत झालेल्या कथित घोटाळ्याची (BMC Ashray Yojana scam) चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Dycm Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यपाल हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळेच जण सतत त्यात लक्ष घालून असतो. कुठेही कुणावर अन्याय होणार नाही अशी घरदारी आम्ही घेतो. अनेक तक्रारी लोकायुक्तांकडे येतात. जर त्यात तथ्य असेल तर वस्तूस्थिती सर्वांच्या समोर येईल. तस्थ्य नसेल तर लोकांनाही कळेल चुकीच्या पद्धतीने तक्रार करत आहेत. काय आहे प्रकरण? मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी असलेल्या आश्रय योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला. या संदर्भात भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी मिळून राज्यपालांकडे तक्रार केली होती. आमदार मिहीर कोटेचा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. बीएमसीच्या या योजनेत 1 हजार 844 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या प्रकरणी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना चौकशीचे निर्देश देले आहेत. वाचा : समीर वानखेडेंसाठी महाराष्ट्र BJP नेत्यांची दिल्लीत लॉबिंग, मलिकांचा खळबळजनक आरोप काय म्हणाले नवाब मलिक? राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याची शिफारस केली आहे. राजभवन हा राजकीय आखाडा झाला आहे. भाजपच्या ईशारावर राज्यपाल काम करत आहेत. राज्यपालांना 12 आमदारांचे नियुक्तीसाठी पत्र दिले आहे. याप्रकरणी निर्णय का घेत नाही? असा सवाल ही नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे. वाचा : कोण अजित पवार? मी ओळखत नाही? अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगला प्रयत्न केला पण दुर्देवाने तेथे यश आले नाही. ज्यांना यश आले आहे त्यांचं मनापासून अभिनंदन.. त्यांनी बँक चांगली चालवावी अशा आमच्या शुभेच्छा. ते पण अनेक वर्षे मंत्रिमंडळात आहेत. कोकणात तौक्ते चक्रीवादळ आलं तेव्हा मदत केली. निसर्ग चक्रीवादळाच्या घटनेनंतर मदत केली. ज्या ज्या गोष्टी कोकणात करायला हव्यात त्या करम्याचा आमचा प्रयत्न आहे. एकमेकांच्या उणी दुणी काढण्यापेक्षा केंद्रात तुम्ही मंत्री आहेत तुमच्या परीने केंद्रातून निधाी आणावा. आम्ही आमच्या परीने राज्यातून निधी देऊ. अशाप्रकारे सर्व मिळून कोकणाचा विकास करू असंही अजित पवार म्हणाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, BMC, Pune

पुढील बातम्या