मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाची रणनिती ठरली; चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाची रणनिती ठरली; चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आज भाजपच्या वतीनं बैठक घेण्यात आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India
  • Published by:  Ajay Deshpande

पुणे, 25 जानेवारी :  भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागांवर लवकरच पोटनिवडणूक होणार असून, महाविकास आघाडीकडून दोनही जागांवर उमेदवार देण्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघात लागलेल्या पोट निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपतर्फे आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक तसेच कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना विनंती करणार आहोत. आम्ही चिंचवड मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा  मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आज भाजपतर्फे जी बैठक घेण्यात आली, त्या बैठकीला  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांची देखील उपस्थिती होती.

ठाकरे गट चिंचवडच्या जागेसाठी आग्रही 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. इथे पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवड अशा दोनही जागेवर उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे संकेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

First published:

Tags: Chandrakant patil