पुणे, 2 मार्च : पुण्यात आज कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी झाली. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.
मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. वनी पेठे हा भाजपचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची पिछेहाट झाली आहे. धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली आणि विजय मिळवला. तर यानिवडणुकीमध्ये आणखी एक उमेदवार होते, ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते, ते म्हणजे हिंदू महासंघाचे आनंद दवे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत स्टार उमेदवार आनंद दवे यांना 296 मते मिळाली आहेत. त्यांच्या यानिवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. दरम्यान, या पराभवनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पराभवानंतर आनंद दवे काय म्हणाले -
भाजपचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे. पण याचा पच्छात्ताप नाही. कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजपच्या विरोधात मतदान केले आहे. मागील वेळेस या प्रभागात मुक्ताताईंना 20000 चे मताधिक्य मिळाले होते. या वेळेस भाजप येथून 1400 मतांनी मागे पडला. तर बेगडी हिंदुत्वाच्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारणे आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरणे याचा राग आमच्यामुळे व्यक्त झाला, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.