पुणे: 5 लाखांची रोकड लुटणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला गुन्हे शाखेकडून अटक

भाजपचा माथाडी विभागाचा अध्यक्ष श्याम शिंदे ज्याला 2016 मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये पावन करून घेण्यात आल होतं.

वैभव सोनावणे | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 08:55 PM IST

पुणे: 5 लाखांची रोकड लुटणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे, 21 जून : खडक भागात 5 लाखांची रोकड लुटणाऱ्या शाम उर्फ भाऊ शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. शाम शिंदे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडीच वर्षापूर्वी त्याचा भाजपात प्रवेश झाला होता. त्यावेळी तो पोलिसाला मारहाण करून नुकताच कारागृहाबाहेर आला होता.

भाजपचा माथाडी विभागाचा अध्यक्ष श्याम शिंदे  ज्याला 2016 मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये पावन करून घेण्यात आल होतं. त्याला पुणे पोलिसांनी पाच लाख रूपयाच्या जबरी चोरीमध्ये गुन्हे शाखेने अटक केलं आहे.

विशेष म्हणजे, संजय काकडे यांच्या पुढाकाराने खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांना मारहाण, दंगल माजवणे, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील पप्पू घोलप, शाम शिंदे, पिंट्या धाडवे या आरोपींना रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या हजेरीत भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...