मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा, पुण्यातून समोर आलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा, पुण्यातून समोर आलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

आजच्या मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही. कारण पुण्यात ज्या गाड्यातून मनसैनिक मुंबईसाठी रवाना होत आहेत.

आजच्या मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही. कारण पुण्यात ज्या गाड्यातून मनसैनिक मुंबईसाठी रवाना होत आहेत.

आजच्या मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही. कारण पुण्यात ज्या गाड्यातून मनसैनिक मुंबईसाठी रवाना होत आहेत.

पुणे, 09 फेब्रुवारी : मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सगळ्यात मनसेच्या मोर्चाला भाजपने पुण्यातून पाठिंबा दिल्याचं एक चित्र समोर आलं आहे.

आजच्या मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ आहे हे लपून राहिलेलं नाही. कारण पुण्यात ज्या गाड्यातून मनसैनिक मुंबईसाठी रवाना होत आहेत. त्यातील एका चारचाकीवर भोसरी येथील भाजप आमदार महेश लांडगे यांचं नाव लिहिण्यात आलं आहे. महेश लांडगे यांच्या पाहुण्यांची ही गाडी आहे. त्यामुळे मनसेच्या मोर्चाला भाजपचाही पाठिंबा असल्याची समोर आलं.

दरम्यान, मुंबईतल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी मनसेच्या मोर्चाला भाजप कामाला लागलं असून मनसेच्या मोर्च्यात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप आता मनसेला मदत करणार असल्याचं बोललं जातं आहे. तसे आदेशच भाजप नेत्यांकडून भाजपच्या मुंबईतील कार्यकर्त्याना देण्यात आले आहेत. याच मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती मिळत असून, भाजपने या मोर्च्याला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या कार्यकर्त्याना मोर्चात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या मोर्च्यात भाजपच्या नेत्यांनी सहभागी व्हायचे की नाही हे अजून ठरलेले नसून, भाजपचे मुंबईचे कार्यकर्ते मात्र मनसेच्या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. त्यात पुण्यातील बसचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय आहे.

महामोर्चाची भव्य तयारी

मनसेचा मोर्चा आझाद मैदानात पोहचल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी एक भव्य स्टेज उभारण्याचं काम सुरू आहे. आझाद मैदान हे तारेच्या कुंपणाने दोन भागांत विभागालं गेलं असल्याने तारेच्या आतमध्ये पदाधिकाऱ्यांना बसण्याची सोय तर सामान्य मनसैनिकांना तारेच्या दुसऱ्या बाजूला बसण्याची सोय करण्यात आली आहे. पोलीस बांदोबस्तही भक्कम आहे.

पुण्यातील रॅलीला परवानगी नाकरली

या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. मोर्चासाठी येणा-या कार्यकर्त्यांच्या गाड्या पारसी जिमखाना येथे लाऊन त्यांनी पायी आझाद मैदानला यावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर मुंबईत मनसेच्या मोर्चाच्या समर्थनासाठी काल मनसेने पुण्यात रॅली आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकरली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे अल्टीमेटम देऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रॅली रद्द करण्यात आली.

इतर बातम्या - धक्कादायक वास्तव! कोरोनामुळे 803 जणांचं आयुष्य संपलं, सरकारचा निष्काळजीपणा भोवला

मनसेच्या आज मुंबईत होणाऱ्या मोर्चामुळे नाशिकमधील मनसे कार्यकर्तेही उत्साहात आहेत. या मोर्चात सामील होण्यासाठी मनसैनिकांनी जय्यत तयारीही सुरू केली आहे. त्यानिमित्ताने नाशिकमधील मनसेचं मध्यवर्ती कार्यालयात मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. मनसे महामोर्चाला परवानगी दिली नाही तरी हा मोर्चा निघणारच अशी भुमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. तसंच या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

हर्षवर्धन जाधवांचा पुन्हा एकदा मनसेत प्रवेश

शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनीही जाधव यांच्यासोबत मनसेत प्रवेश केला. शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौटगे आणि सेनेचे माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेची वाट धरली आहे. आजच्या मोर्चा आधी मनसेमध्ये मराठवाड्यातून हे मोठं इनकमिंग झालं आहे.

बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेला लक्ष्य केलं आहे. बेगड्या हिंदुत्ववाद्यांपासून शिवसेनेला घाबरण्याची गरज नसल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सूचक विधान केलं आहे. आम्ही कधीही हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. मात्र, काही मतलबी लोक शिवसेनेवर टीका करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या राजकीय घडामोडीवर राज ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Lok sabha election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Mumbai, Pune, Sharad pawar