Home /News /pune /

चंद्रकांत पाटील म्हणाले, बोगस मतदान रोखण्यासाठी आता टगेच ठेवले पाहिजेत!

चंद्रकांत पाटील म्हणाले, बोगस मतदान रोखण्यासाठी आता टगेच ठेवले पाहिजेत!

राज्यात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. पण आपल्याला बोगस मतदान रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

पुणे 12 नोव्हेंबर: राज्यात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. पण आपल्याला बोगस मतदान रोखण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आल्यास, आतापासूनच बुथ प्रमुख म्हणून टगे ठेवले पाहिजे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिलं. या आधी अजित पवार यांनी देखील सहा वर्षापुर्वी अशा प्रकाराचं विधान केलं होतं त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. अजित पवार सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, तालुका पातळीवर निवडणूक जिंकण्यासाठी खूप काही करावे लागते. हे येड्यागबाळ्याचे काम नाही. त्यामुळे सदमार्गी लोक या वाटेकडे फिरकतही नाही. या कामासाठी गावाने ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी पण अशाच तालुका पातळीवर निवडून आलो आहोत, त्या अर्थी मीसुध्दा टग्याच आहे'. या विधानाची चांगलीच चर्चा झाली. अजुनही त्या वक्तव्याने त्यांचा पिच्छा सोडलेला नाही. त्यात आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा तश्याच प्रकारचं वक्तव्य केल्याने वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आहे. अशा आहेत जागा आणि उमेदवार एकूण जागा 5 पुणे पदवीधर भाजप - संग्राम देशमुख राष्ट्रवादी - अरुण लाड नागपूर पदवीधर भाजप - संदीप जोशी काँग्रेस - अभिजित वंजारी औरंगाबाद पदवीधर भाजप - शिरीष बोराळकर राष्ट्रवादी - सतीश चव्हाण पुणे शिक्षक काँग्रेस - प्रा जयंत आसगावकर भाजप - जितेंद्र पवार अमरावती शिक्षक भाजप - नितीन धांडे शिवसेना - श्रीकांत देशपांडे एकूण भाजप - 5 उमेदवार काँग्रेस - 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस - 2 उमेदवार शिवसेना - 1 उमेदवार
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Chandrakant patil

पुढील बातम्या