मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे नवीन वर्षात आहेत हे 3 संकल्प

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे नवीन वर्षात आहेत हे 3 संकल्प

 चंद्रकांतदादा पाटील यांनीही या नव्या वर्षासाठी काही संकल्प केले असून त्याबाबत भाष्य केलं आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनीही या नव्या वर्षासाठी काही संकल्प केले असून त्याबाबत भाष्य केलं आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनीही या नव्या वर्षासाठी काही संकल्प केले असून त्याबाबत भाष्य केलं आहे.

मुंबई, 1 जानेवारी : नववर्षाची सुरुवात म्हटलं की प्रत्येकजण उराशी काही नवी स्वप्न बाळगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी संकल्प करतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या नव्या वर्षासाठी काही संकल्प केले असून त्याबाबत भाष्य केलं आहे.

नववर्षात काय आहे चंद्रकांत पाटील यांचा संकल्प?

- नवीन वर्षी जास्तीत जास्त प्रवास करणे, जो कोरोना काळात झाला नाही आणि संघटन मजबूत करणे.

- 2021 साली ग्राम पंचायत ,नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीने लढणे आणि जिंकणे

- 2022 साली होणाऱ्या मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे जिंकणे हे लक्ष्य

मुंबई निवडणुकीबाबत मोठी घोषणा

पुढील वर्षी अर्थातच 2022 मध्ये होणारी मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व ठेवणाऱ्या शिवसेनेला भाजपकडून जोरदार आव्हान दिलं जाणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनीही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अमित शहा हेदेखील महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत ठाण मांडण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद...संभाजीनगर आणि राजकारण

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या नामांतराला विरोध असल्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याने नवा वाद निर्माण झाला. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा,' अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil