• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • भाजप-मनसे युतीला रामदास आठवलेंचा विरोध, म्हणाले...

भाजप-मनसे युतीला रामदास आठवलेंचा विरोध, म्हणाले...

'राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो'

'राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो'

'राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो'

  • Share this:
पुणे, 19 ऑक्टोबर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे (mns) आणि भाजपच्या (bjp) युतीची चर्चा रंगली आहे. याआधी पालघरमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपच्या युतीचा आरंभ झाला आहे. तर दुसरीकडे रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी मनसेला सोबत घेण्यावर आक्षेप घेतला आहे.  'रिपाइं'ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती (mns bjp allince) करू नये, अशी भूमिकाच आठवले यांनी मांडली आहे. रिपाइंच्या वतीने पुण्यातील विश्रामगृहात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी  रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत आपली भूमिका मांडली. "आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) भक्कम साथ आहे. 'रिपाइं'ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करू नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपने मनसेच्या सोबत जाणे योग्य होणार नाही," असा सल्लाच आठवले यांनी भाजपला दिला. Team India च्या कोचला मिळणार इतका पगार, कॅप्टनलाही टाकणार मागे! तसंच, "पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांनाही चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणार आहे.' असंही आठवले म्हणाले. "जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे," असंही आठवले म्हणाले. जेलमधून बाहेर पडताच 2 खुनाची केली तयारी, एकाची केली हत्या, सोलापुरात खळबळ देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली.
Published by:sachin Salve
First published: