पुण्यात भाजपा-राष्ट्रवादीत वाकयुद्ध; सुप्रियाताईंच्या आरोपांना महापौर मुरलीधरांचं जोरदार प्रत्युत्तर

"महापौरांना पुण्याचा कारभार झेपत नसेल तर राजीनामा द्या" अशी टीका केली होती. त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"महापौरांना पुण्याचा कारभार झेपत नसेल तर राजीनामा द्या" अशी टीका केली होती. त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:
पुणे, 25 जून : आंबिल ओढा अतिक्रमण कारवाईवरून पुण्यात आता राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपात (BJP) जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी, "महापौरांना पुण्याचा कारभार झेपत नसेल तर राजीनामा द्या" अशी टीका केली होती. त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "आमचं कालही म्हणणं होतं, आजही आहे आणि उद्याही असेल. आंबील ओढा अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला कोणी? प्रशासनावर दबाव कोणी आणला? हा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी माननीय सुप्रियाताईंची ही केविलवाणी धडपड आहे. संबंधित विकासक कोणाच्या जवळचा आहे, हे सर्व पुणेकर जाणतात. हल्ली लोकसभा निवडणुका नसल्याने सुप्रियाताई पुण्यात जास्त नसतात, त्यामुळे त्यांना पुण्यात काय चाललंय याची जास्त माहिती नसावी. महापौर एवढंच बोलून थांबले नाही तर राजीनाम्याच्या मागणीवरून त्यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार फटकार लगावली आहे. "प्रश्न उरला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा. तर सर्व पुणेकरांना माहिती आहे कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटात आम्ही किती सक्षमपणे लढलो. पुण्याला संकटातून बाहेर काढलं. आमच्या लढ्याचं कौतुक त्यांचेच बंधू असलेले पालकमंत्री माननीय अजितदादांनीही केलं आहे. कदाचित अजितदादांच्या मताशी सुप्रियाताई सहमत नसतील, असा प्रतिटोमणाही महापौरांनी सुप्रिया ताईंना मारला. कालच्या आंबिल ओढा अतिक्रमण हटाव कारवाईसाठी पालकमंत्री अजित पवारांनीच पालिका आयुक्तांना आदेश दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. हे ही वाचा-महाराष्ट्रात मॉल्स बंद, थिएटर्सना कुलूप! दुकानं आणि रेस्टॉरंटचं शटर 4 वाजता डाऊन हाच धागा पकडून महापौरांनी सुप्रियाताई सुळे यांच्यावर हे शरसंधान साधलं आहे. आता आपण खा. सुप्रियाताई सुळे यांनी महापौरांवर नेमके काय आरोप केले होते तेही पाहुयात... "पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यातील आंबिल ओढ्यावरील कारवाईबाबत चौकशी व्हावी, कारण आंबिल ओढ्यावर कारवाई कोणी केली, हे सर्वांना माहित आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून त्यांनीच ही कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी व्हावी. तसेच महापौरांनी याप्रकरणी उत्तर द्यावं. आणि हे सर्व झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा," असंही सुप्रिया सुळे काल पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या. सुप्रियाताईंच्या या आरोपानंतरच भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: