व्याह्याच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयात आले संजय काकडे, पण...

व्याह्याच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयात आले संजय काकडे, पण...

आमदार अनिल भोसले हे भाजपचे संजय काकडे यांचे व्याही आहेत. त्यामुळे व्याह्यांना अटक झाल्याचे समजताच संजय काकडे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. ते पोलिस आयुक्तालयातही पोहोचले.

  • Share this:

पुणे, 26 फेब्रुवारी: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत 71 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार अनिल भोसले हे भाजपचे संजय काकडे यांचे व्याही आहेत. त्यामुळे व्याह्यांना अटक झाल्याचे समजताच संजय काकडे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. ते पोलिस आयुक्तालयातही पोहोचले. पण त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.

'बांगड्या' वक्तव्यावरून आता अमृता फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर विखारी टीका, म्हणाल्या...

आमदार अनिल भोसले आणि चार जणांना शिवाजीराव भोसले बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर तातडीने त्यांचे व्याही संजय काकडे हे बुधवारी पोलिस आयुक्तांच्या भेटीला आले होते. अनिल भोसले यांना लॉकअपमधून काढून त्याचवेळी पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले होते. आज विधान परिषद अध्यक्षांनी ही सभागृहात अनिल भोसले यांच्या अटकेची माहिती आमदारांना दिली. बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस.व्ही.जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, सध्या ते भाजपच्या नजीक गेले आहेत. अजित पवार यांनी भोसले यांना सगळ्यात मोठा गद्दार संबोधले होते. एकेकाळी अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून अनिल भोसले ओळखले जात होते.

आता नराधमांची खैर नाही.. अधिवेशन संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात 'दिशा कायदा'

भाजपला धक्का, फडणवीसांचे निकटवर्तीय खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर..

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे खासदार संजय काकडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी उदयनराजेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उदयनराजें भोसले यांच्यावर टीका करत भाजपच्या उमेदवारीवर दावा ठोकला होता. मात्र, गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करत भाजपला अडचणीत आणले होते. त्यामुळे त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे.

कोरोना व्हायरसमुळे येऊ शकते आर्थिक मंदी, मूडीजच्या तज्ज्ञांचा अहवाल

दुसरीकडे, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. उदयनराजेंच भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल संजय काकडेंनी उपस्थित केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. गेल्यावर्षी देखील संजय काकडे राष्ट्रवादीत जाणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडेंची मनधरणी केली होती. आता पुन्हा एकदा काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First published: February 26, 2020, 5:47 PM IST

ताज्या बातम्या