Home /News /pune /

गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर, आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केलं स्वागत

गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर, आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केलं स्वागत

भाजपच्या बड्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर, ठाकरे सरकारच्या 'त्या' निर्णयाचं केलं स्वागत

भाजपच्या बड्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर, ठाकरे सरकारच्या 'त्या' निर्णयाचं केलं स्वागत

Maharashtra News: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याच दरम्यान आता ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरही भाजपने आक्षेप घेतला आहे.

पुणे, 25 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने (Thackeray Government) आमदारांच्या घरांसंदर्भात एक घोषणा केली. मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी 300 एचआयजीची घरे (MHADA houses for 300 MLAs in Mumbai) बांधण्यात येणार आहेत. एमएमआर रिजनमधील आमदारांना वगळून ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जाणार आहेत. मात्र, या निर्णयावर ठाकरे सरकारने आक्षेप घेत आमदारांना मोफत घरांची आवश्यकता काय? अशा प्रश्न उपस्थित केला. भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका होत असतानाच भाजपच्या खासदाराने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या शासन निर्णयाचं खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी समर्थन केलं आहे. लोकप्रतिनिधींना मुंबई म्हाडामार्फत विकत घरं देण्याच्या निर्णयात काहीच गैर नसल्याचं खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 300 आमदारांना फुकटात घरं नाही - जितेंद्र आव्हाड 300 आमदारांना घरं बांधून देणार अशी घोषणा केली आहे. या घोषणेवरून राज्यभरात एकच चर्चा रंगली असून भाजपनेही यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, आमदारांना मोफत घरं दिली जाणार नसून त्यांची किंमत आमदारांना आकारली जाणार आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. 'आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे' असं आव्हाडांनी स्पष्ट केलं. 'आमदार फुटू नये म्हणून घरांची घोषणा' 300 आमदारांना घरं बांधून देणार अशी घोषणा ठाकरे सरकारने केली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतला आहे'. 'आमदारांना कशाला घर कशाला हवं आहे. कुणी आमदार व्हायला नारळ दिला नव्हता. मी म्हणतो घर कशाला हवे. या लोकाना रोज डिप्लोमेसी करावी लागत आहेत. मुळात महाविकास आघाडीचे आमदार फुटू नये म्हणून ही घोषणा केली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Maharashtra News, Pune, Uddhav thackeray

पुढील बातम्या