मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले' गिरीश बापट यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

'भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले' गिरीश बापट यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं निधन झालं आहे.

भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं निधन झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च- भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होतं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने देखील गिरीश बापट यांना सोशल मीडिया पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने गिरीश बापट यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

वाचा-Girish Bapat : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

गिरीश बापट यांच्यासोबत फोटो शेअर करत रुचिता जाधवने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गिरीश बापट आणि पुणे हे भाजपसाठी समीकरण बनलं होतं. गिरीश बापट यांनी जवळपास 30वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. गिरीश बापट हे 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. 1996 मध्ये त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली होती. मात्र बापट यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभूत केलं होतं.

गिरीश बापट हे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते जोडलेले होते. आधी नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती. 1995 पासून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2029 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला होता.गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी तळेगाव दाभाडे इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. 1973 मध्ये ते टेल्को कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली. दोन वर्षांतच ते आणीबाणीमध्ये दीड वर्ष त्यांनी तरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी संघ परिवारामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलं.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment