मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Girish Bapat : भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये दाखल

Girish Bapat : भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये दाखल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 29 मार्च : भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसतानाही पुण्यात कसबा पेठ पोट निवडणुकीत ते व्हिलचेअरवर बसून प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

गिरीश बापट यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: BJP